पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळची जनता व नेपाळ सरकारचे देशातील निवडणुकांच्या यशस्वी व शांततापूर्ण आयोजनाबद्दल अभिनंदन केले आहे.
नेपाळच्या जनतेने आपला लोकशाही हक्क मोठ्या उत्साहाने बजावल्याचे पाहून समाधान वाटल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. नेपाळमधील निवडणुकांचे यशस्वी आयोजन हा नेपाळच्या लोकशाही वाटचालीतील ऐतिहासिक टप्पा तसेच अभिमानाची बाब असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
भारत हा नेपाळचा जवळचा मित्र व शेजारी असून नेपाळची जनता व नवीन सरकारसोबत नेपाळला शांततेच्या, प्रगतीच्या व समृद्धीच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी मदत करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.
पंतप्रधानांनी एक्स वरील आपल्या संदेशात लिहिले आहे,
“नेपाळमध्ये निवडणुकांचे यशस्वी व शांततापूर्ण आयोजन केल्याबद्दल मी नेपाळची जनता आणि नेपाळ सरकारचे अभिनंदन करत आहे. नेपाळच्या बंधुभगिनींनी आपला लोकशाही हक्क मोठ्या उत्साहाने बजावल्याचे पाहून समाधान वाटले.
नेपाळच्या लोकशाही वाटचालीतील हा एक ऐतिहासिक टप्पा व अभिमानाची बाब आहे.
नेपाळचा जवळचा मित्र व शेजारी या नात्याने नेपाळची जनता व नवीन सरकारसोबत काम करत नेपाळला शांततेच्या, प्रगतीच्या व समृद्धीच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी भारत आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे.”
I warmly congratulate the people and Government of Nepal on the successful and peaceful conduct of elections. It is heartening to see my Nepali sisters and brothers exercise their democratic rights so vibrantly.
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2026
This historic milestone is a proud moment in Nepal’s democratic…
सफलतापूर्वक र शान्तिपूर्ण रूपमा निर्वाचन सम्पन्न भएकोमा म नेपालका जनता र सरकारलाई हार्दिक बधाई दिन चाहन्छु। मेरा नेपाली दिदीबहिनी तथा दाजुभाइहरूले आफ्नो लोकतान्त्रिक अधिकार यति जीवन्त रूपमा प्रयोग गरेको देख्न पाउँदा अत्यन्तै खुशी लागेको छ।
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2026
यो ऐतिहासिक उपलब्धि नेपालको…


