पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलबुर्गीमध्ये पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्कची उभारणी झाल्याबद्दल कर्नाटकातील जनतेचे अभिनंदन केले आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या ट्विट संदेशाला उत्तर देताना पंतप्रधानांनी म्हटले आहे, "कलबुर्गी येथे पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्कची उभारणी झाली त्याबद्दल कर्नाटकातील बंधू भगिनींचे अभिनंदन!  हा पार्क कर्नाटकाची समृद्ध वस्त्रपरंपरा अधिक समृद्ध करेल, त्याचबरोबर जनतेसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करेल."

#PragatiKaPMMitra”

लोकसभा खासदार उमेश जाधव यांच्या ट्विटर संदेशाला उत्तर देताना मेगा टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून देशाच्या वस्त्र प्रावरणाचे वैविध्य जगाला दाखवण्याच्या क्षमतेचा उल्लेख केला.

पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे " कर्नाटक, खासकरून कलबुर्गीसाठी हा विशेष दिवस आहे. या टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून जगाला भारताच्या वस्त्र- प्रावरणाच्या वैविध्याची तसेच येथील कारागिरांच्या कलात्मकतेचे दर्शन घडेल."

#PragatiKaPMMitra”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How India’s Rs 175 crore Diving Support Craft projects strengthen Navy’s underwater capabilities

Media Coverage

How India’s Rs 175 crore Diving Support Craft projects strengthen Navy’s underwater capabilities
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026