पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष ऑलिम्पिक्स जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक व्यक्त केले आहे. ट्युरिन,इटली येथे झालेल्या या स्पर्धेत भारतीय पथकाने 33 पदकांची घवघवीत कमाई करून देशाचा नावलौकिक वाढवला आहे.

आज संसदेत पंतप्रधानांनी या खेळाडूंशी संवाद साधला आणि त्यांच्या अथक परिश्रम व उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी 'एक्स' या समाज माध्यमावर पोस्ट केले –

"ट्युरिन, इटली येथे झालेल्या विशेष ऑलिम्पिक्स जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धा  2025 मध्ये आपल्या खेळाडूंनी देशाला अभिमान वाटावा असे यश संपादन केले आहे! भारतीय संघाने एकूण 33 पदके जिंकून आपली क्षमता सिद्ध केली आहे.

आज संसदेत या पथकाची भेट घेतली आणि त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले!"

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Goods exports rise 15%+, top $200 billion

Media Coverage

Goods exports rise 15%+, top $200 billion
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
ए. बालकृष्णन जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
August 27, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवेकानंद केंद्राचे अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून सेवा बजावलेल्या ए. बालकृष्णन जी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. बालकृष्णन यांनी आपल्या आयुष्याची पाच दशकांहून अधिक वर्षे स्वामी विवेकानंदांच्या आदर्श आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित केली होती, याची आठवण पंतप्रधानांनी काढली. ईशान्य भारताशी त्यांचे विशेष आणि सखोल नाते होते. शैक्षणिक, सामाजिक तसेच राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी 'X' वर पोस्ट केले:

"विवेकानंद केंद्राचे अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून कार्य केलेल्या ए. बालकृष्णन यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे. बालकृष्णन जी यांनी आपल्या जीवनाची 50 हून अधिक वर्षे स्वामी विवेकानंदांचे विचार आणि समाजसेवेसाठी अर्पित केली. विवेकानंद केंद्राचे सुरुवातीच्या काळातील जीवनव्रती म्हणून त्यांनी देशभरात अहोरात्र कार्य केले. ईशान्य भारताशी त्यांचे विशेष आणि जवळचे नाते होते. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि राष्ट्रउभारणीच्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिले.

विवेकानंद केंद्राचे संपूर्ण कुटुंब आणि त्यांच्या तमाम चाहत्यांप्रती माझ्या भावपूर्ण संवेदना. ॐ शांती.

@vkendra"