पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एफआयएच हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक 2025 मध्ये इतिहास रचणाऱ्या भारतीय पुरुष कनिष्ठ हॉकी संघाचे अभिनंदन केले.
या प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेत भारताला पहिले-वहिले कांस्यपदक मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधानांनी या तरुण आणि उत्साही संघाचे कौतुक केले. ही उल्लेखनीय कामगिरी भारतातील तरुणांची प्रतिभा, दृढनिश्चय आणि लवचिकता दर्शवते, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी यांनी 'एक्स' वर पोस्ट केले:
“एफआयएच हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक 2025 मध्ये इतिहास रचणाऱ्या आपल्या पुरुष कनिष्ठ हॉकी संघाचे अभिनंदन! आपल्या तरुण आणि उत्साही संघाने या प्रतिष्ठित स्पर्धेत भारतासाठी पहिले-वहिले कांस्यपदक मिळवले आहे. त्यांची ही विलक्षण कामगिरी देशभरातील असंख्य तरुणांसाठी प्रेरणादायक आहे.”
Congratulations to our Men's Junior Hockey Team on scripting history at the FIH Hockey Men’s Junior World Cup 2025! Our young and spirited team has secured India’s first-ever Bronze medal at this prestigious tournament. This incredible achievement inspires countless youngsters… pic.twitter.com/iEbPd2Jh1z
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2025


