पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या 800 मीटर स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल ट्रॅक आणि फील्ड धावपटू मोहम्मद अफसल पुलिकलकथचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल मोहम्मद अफसल पुलिकलकथचे अभिनंदन.
त्याची मेहनत आणि जिद्द फळाला आली आहे. भारत या यशाचा आनंदोत्सव साजरा करत आहे. शाब्बास!"
Congratulations Mohammed Afsal Pulikkalakath for clinching the Silver Medal in the Men's 800m Asian Games event.
— Narendra Modi (@narendramodi) October 3, 2023
His hard work and resilience have paid off. India is rejoicing and celebrating this success.
Well done! pic.twitter.com/9FizgVwVN8


