महान गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून शोकभावना व्यक्त केल्या. पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्या सुमधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती, येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीच्या एक दिग्गज म्हणून कायम स्मरणात ठेवतील.

ट्विटच्या शृंखलेत पंतप्रधान म्हणाले;

"मी या दुःखाला शब्दात व्यक्त करू शकत नाही. कनवाळू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने आपल्या देशात एक पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरली जाऊ शकत नाही. आगामी पिढ्या त्यांना  भारतीय संस्कृतीच्या एक दिग्गज म्हणून कायम स्मरणात ठेवतील. त्यांच्या सुमधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती.''

"लता दीदींच्या गाण्यांमध्ये विविध प्रकारच्या भावना होत्या. त्यांनी अनेक दशकांपासून भारतीय चित्रपट जगतातील स्थित्यंतरे जवळून पाहिली. चित्रपटांच्या पलीकडे, त्या  नेहमीच भारताच्या विकासाबद्दल सजग होत्या. त्यांना  नेहमीच एक सामर्थ्यशाली आणि विकसित भारत पाहायचा होता."

"लता दीदींकडून मला नेहमीच अपार स्नेह मिळाला हा मी माझा सन्मान समजतो. माझा त्यांच्याशी  झालेला संवाद अविस्मरणीय राहील. लता दीदींच्या निधनाबद्दल मी माझ्या देशवासीयांसह अत्यंत दुःखी आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून शोक संवेदना व्यक्त केल्या. ओम शांती."

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Marvell to invest $250 million, double India workforce in 3 years

Media Coverage

Marvell to invest $250 million, double India workforce in 3 years
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 30 जुलै 2026
July 30, 2026

Aatmanirbhar in Action: How PM Modi Turned Vision into Export Multipliers & Safer Rails