पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानच्या धौलपूर येथे रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांप्रति शोक व्यक्त केला. राज्य सरकारच्या देखरेखीखाली, स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी कार्यरत आहे असे ते म्हणाले.

एक्स वरील पोस्ट मध्ये  त्यांनी लिहिले:

"राजस्थानच्या धौलपूरमध्ये झालेला अपघात हृदयविदारक आहे. या अपघातात निरपराध मुलांसह प्राण गमावलेल्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांप्रति माझ्या संवेदना. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. तसेच मी सर्व जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी  प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांची  सर्वतोपरी मदत करत आहे: पंतप्रधान."

मोदी यांनी धौलपूर, राजस्थान येथील या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पीएमएनआरएफ (पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी) मधून  प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली. तसेच जखमींना 50,000 रुपये दिले जातील असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर पोस्ट केले:

"पंतप्रधानांनी धौलपूर, राजस्थान येथे झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी 2 लाख रुपये मदत  जाहीर केली आहे. जखमींना 50,000 रुपये दिले जातील."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Foreign traveller calls India's Vande Bharat sleeper a “Five-Star Hotel on Rails”; and the Internet agrees

Media Coverage

Foreign traveller calls India's Vande Bharat sleeper a “Five-Star Hotel on Rails”; and the Internet agrees
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Eminent industry leader Shri Ravi Kant meets the Prime Minister
July 18, 2026

Eminent industry leader Shri Ravi Kant met Prime Minister, Shri Narendra Modi earlier today and presented a copy of his book 'Leading from the Back - To Achieve the Impossible'.

The Prime Minister posted on X;

Eminent industry leader Shri Ravi Kant met PM @narendramodi earlier today and presented a copy of his book 'Leading from the Back - To Achieve the Impossible'.