पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी अपघातामध्‍ये मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशाच्या जवळच्या नातेवाइकाला प्रत्‍येकी  दोन लाख  रुपये तर जखमींना उपचारासाठी प्रत्येकी 50,000 रूपये   सानुग्रह अनुदान  पंतप्रधान राष्‍ट्रीय मदत निधीतून जाहीर केले.  

‘एक्स’या समाज माध्‍यमावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:

"उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे झालेल्या बस दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाले आहे.ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो.जखमींना  लवकर बरे वाटावे.स्थानिक प्रशासन अपघातग्रस्‍तांना मदत करत आहे.

या अपघातातील मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या जवळच्या नातेवाइकाला पंतप्रधान राष्‍ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जातील. तर जखमींना उपचारासाठी प्रत्येकी 50,000 रूपये सानुग्रह अनुदान दिले जाईल:PM@narendramodi"

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Water conservation in India: The community as custodian

Media Coverage

Water conservation in India: The community as custodian
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 मार्च 2026
March 21, 2026

Empowering Bharat Holistically: Health, Finance, Heritage & Export Growth Under the Leadership of PM Modi