पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.
या कठीण प्रसंगी बाधित कुटुंबांच्या पाठीशी आपल्या संवेदना असल्याचे व्यक्त करत मोदी यांनी जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली आणि प्रत्येक मृताच्या निकटच्या नातेवाईकांसाठी 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी'तून (पीएम एन आर एफ) 2 लाख रुपयांच्या सानुग्रह मदतीची घोषणा केली. या घटनेत जखमी झालेल्यांना 50,000 रुपये दिले जातील, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी 'X' वर लिहिले:
"उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे इमारत कोसळून घडलेल्या दुर्घटनेमुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. या कठीण प्रसंगी बाधित नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुर्घटनेत जखमी झालेले नागरिक लवकरात लवकर बरे होवोत, अशी मी प्रार्थना करतो.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या निकटच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल: पंतप्रधान”
Deeply saddened by the mishap due to the collapse of a building in Prayagraj, Uttar Pradesh. My thoughts are with the affected people and their families in this difficult hour. May those injured recover at the earliest.
— PMO India (@PMOIndia) March 23, 2026
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the…


