पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिलीपिन्समध्ये भूकंपामुळे झालेली जीवितहानी आणि मोठ्या नुकसानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. या कठीण काळात भारत फिलीपिन्सच्या पाठीशी भक्क्कम उभा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:
फिलीपिन्समध्ये भूकंपामुळे झालेली जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणातील नुकसानीचे वृत्त दुःखदायक आहे. शोकाकुल कुटुंबांसाठी सहवेदना आणि प्रार्थना. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी कामना करतो. या कठीण काळात भारत फिलीपिन्सच्या पाठीशी भक्कम उभा आहे.
@bongbongmarcos”
Deeply saddened to learn about the loss of lives and widespread damage caused by the earthquake in the Philippines. My thoughts and prayers are with the bereaved families. I wish the injured a speedy recovery. India stands in solidarity with the Philippines at this difficult…
— Narendra Modi (@narendramodi) October 1, 2025


