ओदिशामधील गंजम जिल्ह्यातील बस अपघातात जीवितहानी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पीएमएनआरएफ अर्थात पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून या अपघातात जीव गमावलेल्यांच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपयांचे तर अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला 50,000 रुपयांचे सहाय्य करण्याची घोषणा देखील पंतप्रधानांनी केली आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“ओदिशामधील गंजम जिल्ह्यात झालेल्या बस अपघाताच्या घटनेने अत्यंत व्यथित झालो आहे. या अपघातात प्रिय व्यक्तींना गमावून बसलेल्या लोकांचे सांत्वन करतो. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात हीच प्रार्थना. या अपघातात मृत्यमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला पीएमएनआरएफ मधून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल तसेच अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला 50,000 रुपयांची मदत देण्यात येईल” – पंतप्रधान
Pained by the bus accident in Ganjam district, Odisha. Condolences to those who lost their loved ones. May the injured recover soon. An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 26, 2023
ଓଡ଼ିଶାର ଗଞ୍ଜାମ ଜିଲ୍ଲାରେ ଘଟିଥିବା ମର୍ମନ୍ତୁଦ ବସ ଦୁର୍ଘଟଣାରେ ମୁଁ ମର୍ମାହତ । ମୃତକଙ୍କ ପରିବାର ବର୍ଗଙ୍କୁ ସମବେଦନା ଜଣାଉଛି । ଆହତଙ୍କ ଆଶୁ ଆରୋଗ୍ୟ କାମନା କରୁଛି । ପ୍ରଧାନମନ୍ତ୍ରୀ ରାଷ୍ଟ୍ରୀୟ ରିଲିଫ୍ ପାଣ୍ଠି(PMNRF)ରୁ ମୃତକଙ୍କ ପରିବାରକୁ ୨ ଲକ୍ଷ ଟଙ୍କା ଅନୁକମ୍ପା ମୂଳକ ସହାୟତା ରାଶି ପ୍ରଦାନ କରାଯିବ । ଆହତ ମାନଙ୍କୁ ୫୦…
— PMO India (@PMOIndia) June 26, 2023


