पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील एका सार्वजनिक सभेत झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि अपघातातील जखमींना 50,000 रुपये मदतनिधीची घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे:
"आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे एका सार्वजनिक सभेत झालेल्या दुर्घटनेमुळे दुःख झाले. शोकग्रस्त कुटुंबीयां प्रति सहवेदना. जखमी लवकर बरे होवोत. प्रत्येक मृतांच्या वारसाला पीएमएनआरएफ मधून 2 लाख रुपयांची मदत देण्यात येईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi"
Pained by the mishap at a public meeting in Nellore, AP. Condolences to the bereaved families. May the injured recover soon. An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased and the injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 29, 2022


