उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त केली असून, जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर म्हटले आहे:

"उत्तराखंड के रुद्रप्रयाग में हुआ सड़क हादसा हृदयविदारक है। इसमें अपने प्रियजनों को खोने वाले शोकाकुल परिजनों के प्रति मेरी गहरी संवेदनाएं। इसके साथ ही मैं सभी घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं। राज्य सरकार की देखरेख में स्थानीय प्रशासन पीड़ितों की हरसंभव मदद में जुटा है: PM "

 

“उत्तराखंड मध्ये रुद्रप्रयाग येथील रस्ते अपघात दुःखदायक आहे. अपघातात आपल्या प्रियजनांना गमावणाऱ्या शोकाकुल कुटुंबांप्रति सह-वेदना. त्याचबरोबर अपघातातील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करत आहे: पीएम"

पंतप्रधानांनी अपघातग्रस्तांना सानुग्रह अनुदानही जाहीर केले आहे.

पोस्टनुसार, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून, मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत दिली जाईल.

पंतप्रधान कार्यालयाने (PMO) X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:

"प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला PMNRF मधून 2 लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत दिली जाईल: पीएम"

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's Economic Journey: From Licence Raj To Pragmatic Governance

Media Coverage

India's Economic Journey: From Licence Raj To Pragmatic Governance
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 ऑगस्ट 2026
August 27, 2026

Make in India Goes Global: Engineering Boom, Rice Triumph & EU FTA Breakthrough Under PM Modi