उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी येथे एका अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा देखील पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून(पीएमएनआरएफ) दोन लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदतीची घोषणा केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहे;
यूपीमधील लखीमपूर खेरी येथील अपघातामुळे व्यथित झालो आहे. शोकमग्न कुटुंबांकडे दुःख व्यक्त करत आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊ देत. प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला पीएमएनआरएफ मधून दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये देण्यात येतील: PM @narendramodi"
Distressed by the accident in Lakhimpur Kheri, UP. Condolences to the bereaved families. May the injured recover quickly. Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 28, 2022


