पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किश्तवाड येथे झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानी बद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी, प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्यता निधीतून (PMNRF) अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांसाठी 2 लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांच्या सानुग्रह मदतीची घोषणाही केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले:
"किशतवाडमधील दुर्घटनेने दु:ख झाले आहे. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत. या अपघातातील जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात. PMNRF मधून प्रत्येक मृताच्या कुटुंबीयाला 2 लाख रुपये दिले जातील, तर जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi".
Saddened by the accident in Kishtwar. My thoughts are with the bereaved families. May the injured recover at earliest. Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 31, 2022


