नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित वृत्तीने नव्या जोमाने कार्य करावे आणि पर्यावरण अधिकाधिक हरित आणि उत्तम बनवण्यासाठी मूलभूत पातळीवर काम करणाऱ्यांच्या अतुलनीय योगदानाचे कौतुक करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये आपले विचार व्यक्त करतांना म्हटले आहे:
"आजच्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आपल्या वसुंधरेच्या रक्षणासाठी आणि येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी आपले प्रयत्न अधिक व्यापक करुया. आपले पर्यावरण अधिक हरित आणि उत्तम बनवण्यासाठी मूलभूत स्तरावर कार्य करणाऱ्या सर्वांचे मी कौतुक करतो."
This #WorldEnvironmentDay, let’s deepen our efforts towards protecting our planet and overcoming the challenges we face. I also compliment all those working at the grassroots to make our environment greener and better. pic.twitter.com/E7mWAFZ73V
— Narendra Modi (@narendramodi) June 5, 2025


