न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी आयोजित केलेल्या भारत-न्यूझीलंड: एक यशस्वी भागीदारी, या विषयावरील एका विशेष स्नेहभोजन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला राजकीय, व्यापार, उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान, क्रीडा आणि कला या क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

आपल्या स्वागतपर भाषणात, पंतप्रधान लक्सन यांनी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दृढ आणि शाश्वत संबंधांवर प्रकाश टाकला, तसेच द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी आणि परस्पर समृद्धी साधण्यासाठीचा सामायिक दृष्टीकोन मांडला. पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांमधील परस्परपूरक बाबी आणि नागरिकांच्या नागरिकांबरोबरच्या दृढ संबंधांचा उल्लेख आपल्या संदेशात केला. त्यांनी द्विपक्षीय संबंधांना धोरणात्मक भागीदारी पातळीवर नेल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच सध्या सुरु असलेले सहकार्य अधिक दृढ होईल असा विश्वासही व्यक्त केला. पंतप्रधान म्हणाले की, विक्रमी वेळेत पूर्ण झालेला भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार दोन्ही देशांमधील व्यवसाय, युवक आणि शेतकऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण करेल आणि 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करेल.

स्नेहभोजनानंतर, पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान लक्सन यांनी कार्यक्रमस्थळी प्रदर्शित केलेल्या नाविन्यपूर्ण क्रीडा उपकरणांची पाहणी केली. त्यांनी न्यूझीलंडचे यशस्वी खेळाडू आणि उच्च-स्तरीय क्रीडा क्षेत्राशी संबंधित इतर घटकांशी संवादही साधला. दोन्ही देशांच्या क्रीडा क्षेत्रातील 100 वर्षांच्या संबंधांची आठवण करून देताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, या भेटीदरम्यान निश्चित झालेली क्रीडा संयुक्त कृती योजना दोन्ही देशांना क्रिकेटपलीकडे जाऊन संबंध विस्तारण्यास मदत करेल. ही भेट दोन्ही देशांचे क्रीडा सहकार्य वाढवण्याच्या इच्छेनुसार होती.
भारत 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवण्याच्या तयारीत असताना याविशेष भेटीचे महत्त्व अधिक आहे.
Click here to read full text speech
आज चालीस वर्षों के बाद भारतीय प्रधानमंत्री की न्यूजीलैंड यात्रा हो रही है।
— PMO India (@PMOIndia) July 11, 2026
यह हमारे संबंधों के एक नए अध्याय का शुभारंभ है: PM @narendramodi
हमने भारत-न्यूजीलैंड संबंधों को Strategic Partnership के स्तर पर ले जाने का ऐतिहासिक निर्णय लिया है।
— PMO India (@PMOIndia) July 11, 2026
इसके अंतर्गत हम हर क्षेत्र में स्पष्ट लक्ष्यों और ठोस परिणामों के साथ आगे बढ़ेंगे: PM @narendramodi
इस वर्ष हमने record समय में Free Trade Agreement किया।
— PMO India (@PMOIndia) July 11, 2026
इस उपलब्धि से दोनों देशों के उद्योगों, किसानों और युवाओं के लिए नए द्वार खुलेंगे: PM @narendramodi
आज हमने Indo-Pacific में maritime cooperation के लिए एक framework पर सहमति बनाई है।
— PMO India (@PMOIndia) July 11, 2026
Bilateral naval exercises, logistics support और hydrography में सहयोग से हमारा आपसी तालमेल बढ़ेगा: PM @narendramodi
वैश्विक मंच पर भी भारत और न्यूज़ीलैंड भरोसेमंद साझेदार और करीबी मित्र हैं।
— PMO India (@PMOIndia) July 11, 2026
हमारा मानना है कि वर्तमान समय की चुनौतियों का सामना करने के लिए UN सहित अन्य वैश्विक संस्थानों में reform आवश्यक है: PM @narendramodi


