पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन प्रश्न आणि ऑपरेशन गंगा या विषयावर गेल्या काही दिवसांपासून संसदेत झालेल्या निकोप चर्चेचे कौतुक केले आहे. आपल्या विचारांनी चर्चा समृद्ध करणाऱ्या सर्व संसद सदस्यांचे त्यांनी आभार मानले. प्रतिकूल परिस्थितीत आपल्या देशवासीयांच्या सुरक्षेची आणि कल्याणाची काळजी घेणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"गेल्या काही दिवसांपासून संसदेत युक्रेनमधील परिस्थिती आणि ऑपरेशन गंगाद्वारे आपल्या नागरिकांना मायदेशी परत आणण्याच्या भारताच्या प्रयत्नांविषयी निकोप चर्चा झाली आहे. मी सर्व खासदार सहकाऱ्यांचा आभारी आहे ज्यांनी त्यांच्या विचारांनी ही चर्चा समृद्ध केली."

"चर्चेची समृद्ध पातळी आणि रचनात्मक मुद्दे हे स्पष्ट करतात की परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत द्विपक्षीयता कशी असते. अशी द्विपक्षीयता जागतिक स्तरावर भारतासाठी चांगली आहे."

"आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेची आणि कल्याणाची काळजी घेणे हे आमचे सामूहिक कर्तव्य आहे आणि भारत सरकार प्रतिकूल परिस्थितीत आमच्या लोकांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही याची खात्री करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही."

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
IIT Delhi tops India in QS Rankings 2027; 52 Indian institutions feature

Media Coverage

IIT Delhi tops India in QS Rankings 2027; 52 Indian institutions feature
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 18 जून 2026
June 18, 2026

PM Modi’s Leadership Delivers: Electronic Interlocking, Semiconductor Push & Tariff-Free UK Access