पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या परीक्षा पे चर्चा' साठी मौल्यवान सूचना आणि अनुभव सामायिक करत, यासंदर्भात लाखो लोकांनी दाखवलेल्या उत्साहाचे कौतुक केले आहे . परीक्षा पे चर्चा' मध्ये योगदान दिलेल्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचेही त्यांनी आभार मानले.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"या वर्षीच्या परीक्षा पे चर्चा' ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. लाखो लोकांनी त्यांच्या मौल्यवान सूचना आणि अनुभव सामायिक केले आहेत. मी त्या सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे आभार मानतो .
1 एप्रिलच्या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट पाहत आहे."
The enthusiasm towards this year’s Pariksha Pe Charcha has been phenomenal. Lakhs of people have shared their valuable insights and experiences. I thank all those students, parents and teachers who have contributed.
— Narendra Modi (@narendramodi) March 30, 2022
Looking forward to the programme on 1st April. https://t.co/nvXedTvh9F


