पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांनी आज माले येथे मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाच्या (एमओडी) अत्याधुनिक इमारतीचे संयुक्तपणे उद्घाटन केले.

हिंदी महासागराचे दृश्य टिपणारी ही अकरा मजली इमारत दोन्ही देशांमधील मजबूत आणि दीर्घकालीन संरक्षण तसेच सुरक्षा सहकार्याचे प्रतीक आहे.

संरक्षण मंत्रालयाची ही इमारत भारताच्या आर्थिक मदतीने बांधण्यात आली असून ती मालदीवच्या संरक्षण आणि कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या क्षमता वाढविण्यात योगदान देईल.
President Muizzu and I inaugurated a new building of the Ministry of Defence in Malé. This is yet another instance of strong India-Maldives cooperation.@MMuizzu pic.twitter.com/k540iszTyM
— Narendra Modi (@narendramodi) July 25, 2025
ރައީސް މުޢިއްޒުއާއި އެކު އަޅުގަނޑު ވާނީ ޑިފެންސް މިނިސްޓްރީގެ އައު އިމާރާތް އިފްތިތާޙުކޮށްފައި. މިއީ އިންޑިއާ އާއި ދިވެހިރާއްޖޭގެ ދެމެދު އޮތް ވަރުގަދަ އެއްބާރުލުމުގެ މިސާލެއް.@MMuizzu pic.twitter.com/XAgjQLKRAW
— Narendra Modi (@narendramodi) July 25, 2025


