शेअर करा
 
Comments
We are in favour of making ties with Spain even more productive in the coming years: PM
The discussions with President Mariano Rajoy will lead to enhancement of India-Spain bilateral ties: PM Modi
Vision of "New India" will be enhanced through the "New Momentum" in relations between India and Spain: PM Modi
Seven key agreements exchanged between India and Spain, covering subjects such as energy, security and civil aviation

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पेनचे राष्ट्राध्यक्ष मारिआनो राजॉय यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशातले संबंध अधिक विकसित होण्यासाठी आजची चर्चा उपयुक्त ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी चर्चेच्या सुरुवातीला व्यक्त केला. परस्परांशी जोडल्या गेलेल्या आणि परस्परांवर अवलंबून असणाऱ्या या जगात, भारत आणि स्पेन, परस्परांच्या आणि जागतिक कल्याणसाठीही एकत्र काम करू शकतात असं सांगून स्पेनचे राष्ट्राध्यक्ष हे द्रष्टे नेते असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारत आणि स्पेन हे दोनही देश दहशतवादाचा मुकाबला करत असून दहशतवादाच्या उच्चाटनावर उभय देश लक्ष केंद्रीत करतील असे पंतप्रधान म्हणाले.

भारत आणि स्पेन यांच्यातल्या संबंधाना नवी गती प्राप्त होऊन त्याद्वारे नवभारताच्या उभारणीला आणखी बळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ऊर्जा, सुरक्षा, नागरी हवाई वाहतुकीसह सात करारांवर उभय देशांनी स्वाक्षऱ्या केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यानंतर स्पॅनिश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारतात अधिक गुंतवणूक करण्यासाठी स्पेनला मोठा वाव असल्याचे पंतप्रधानांनी या बैठकीदरम्यान सांगितले. पायाभूत सोयी-सुविधा, नवीकरणीय ऊर्जा, अन्न प्रक्रिया, वाहनक्षेत्र, रसायन आणि वस्त्रोद्योग या क्षेत्रांचा त्यांनी यासंदर्भात उल्लेख केला. स्मार्ट सिटी उपक्रमात स्पेननं सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केले. वस्तू आणि सेवा करासह भारताने हाती घेतलेल्या आर्थिक सुधारणांचा विस्तृत आढावा त्यांनी दिला. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्ट अप इंडिया यासारख्या उपक्रमामुळे जागतिक गुंतवणूक भारताकडे आकर्षित होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. महामहीम राजे फिलीप सहावे यांचीही पंतप्रधानांनी भेट घेतली.

Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
India to enhance cooperation in energy, skill development with Africa

Media Coverage

India to enhance cooperation in energy, skill development with Africa
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 जून 2018
June 17, 2018
शेअर करा
 
Comments

#TeamIndia working towards bringing historic transformation in the nation