पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयेन यांचे नवी दिल्ली येथे स्वागत केले.

यावर्षी होणाऱ्या रायसीना संवादामध्ये उद्‌घाटनपर भाषण करण्याचे मान्य केल्याबद्दल पंतप्रधानांनी  युरोपीय आयोगाच्या अध्यक्षांचे आभार मानले. आजच्या दिवशी काही वेळाने होणारे त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

भारत आणि युरोप हे मोठ्या आकाराचे आणि चैतन्यमय लोकशाही समाज समान प्रकारची मूल्ये जपतात तसेच अनेक जागतिक पातळीवरील विषयांच्या बाबतीत दोन्ही देशांचे समान मत आहे यावर दोन्ही नेत्यांचे बैठकीत एकमत झाले.

आजच्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी मुक्त व्यापार करार आणि गुंतवणूक करार यांच्या संदर्भात आगामी काळात पुन्हा सुरु होणाऱ्या वाटाघाटींसह भारत-युरोपियन युनियन धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतला. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील संबंधांच्या सर्व पैलूंचे राजकीय पातळीवरील निरीक्षण सादर करण्यासाठी तसेच दोन्ही देशांदरम्यान सहकार्याच्या विविध क्षेत्रांमध्ये समन्वय सुनिश्चित करण्यासाठी उच्च-स्तरीय व्यापार आणि तंत्रज्ञान आयोग स्थापन करण्याबाबत पंतप्रधान आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षांनी मान्यता दिली.

हरित हायड्रोजन सारख्या क्षेत्रांमध्ये भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये होऊ शकणाऱ्या सहकारी संबंधांच्या शक्यतेसह हवामान विषयक समस्यांवर दोन्ही नेत्यांनी या बैठकीत विस्तृत चर्चा केली. अजूनही सर्वांसमोर असलेल्या कोविड-19 संसर्गाच्या आव्हानाबाबत देखील त्यांनी विचारविनिमय केला आणि कोविड प्रतिबंधक लस तसेच इतर औषधांचा जगाच्या सर्व  भागात न्याय्य पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर दिला.

त्याचबरोबर, या बैठकीत युक्रेनमधील परिस्थिती तसेच हिंद-प्रशांत भागातील घडामोडींसह प्रादेशिकदृष्ट्या महत्त्वाच्या इतर अनेक भू-राजकीय समस्यांवर चर्चा झाली.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'We'll provide AI skill training to 1 crore youth': PM Modi's big announcement on Independence Day 2026

Media Coverage

'We'll provide AI skill training to 1 crore youth': PM Modi's big announcement on Independence Day 2026
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 ऑगस्ट 2026
August 15, 2026

Azadi Ka Amrit Mahotsav Continues: PM Modi’s Independence Day Vision Unites Growth, Youth Power & National Pride