पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वॉल्टर रसेल मीड यांच्या नेतृत्वाखालील विचारवंत आणि व्यवसाय धुरीण यांचा समावेश असलेल्या अमेरिकन प्रतिनिधी मंडळाशी संवाद साधला.
पंतप्रधानांनी भारत-अमेरिका संबंध दृढ करण्यात आणि जागतिक शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी उभय देशांमधील भागीदारी वाढविण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये लिहिले;
“वॉल्टर रसेल मीड यांच्या नेतृत्वाखालील विचारवंत आणि व्यवसाय धुरीण यांचा समावेश असलेल्या अमेरिकन प्रतिनिधी मंडळाशी संवाद साधताना आनंद झाला. भारत-अमेरिका संबंध दृढ करण्यात आणि जागतिक शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी आपली भागीदारी वाढविण्यात त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.
@wrmead”
Glad to interact with a US delegation of thinkers and business leaders led by Mr. Walter Russell Mead. Value their contribution in strengthening India-US ties and advancing our partnership for global peace, progress and prosperity.@wrmead pic.twitter.com/Nw3snfzB4C
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2025


