शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे पाण्यावरील विमानतळ आणि केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीला अहमदाबादमधील साबरमती नदी किनाऱ्याशी जोडणाऱ्या सागरी विमान सेवेचे उद्घाटन केले.

पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबाद येथील साबरमती नदी किनाऱ्यावर पाण्यावरील विमानतळाचे उद्घाटन केले आणि साबरमदी नदी किनाऱ्यापासून केवडिया पर्यंत असलेल्या सागरी विमान सेवेचे देखील उद्घाटन केले. शेवटच्या टोकापर्यंत दळणवळण पोहोचविण्यासाठी पाण्यावरील नियोजित विमानतळ मालिकेचा हा एक भाग आहे.

विमानाला उतरण्यासाठी आखलेले पट्टे किंवा धावपट्टी उपलब्ध नसताना देखील पाण्यावरून विमानाचे उड्डाण करण्याची आणि पाण्यावर उतरण्याची क्षमता या सागरी विमानामध्ये आहे. अशा प्रकारे भौगोलिक क्षेत्र / असे क्षेत्र की ज्यास त्याच्या भौगोलिक कारणास्तव काही आव्हाने आहेत, ते जोडण्यास मदत केली जाऊ शकते आणि विमानतळ आणि धावपट्टी बांधण्यासाठी अधिक खर्च न करता भारतातील दुर्गम भागांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेता येईल. असे लहान आकाराचे पंख असलेली विमाने पाणी असलेल्या पृष्ठभागावर जसे की तलाव, बॅकवॉटर आणि धरणे, वाळूचे रस्ते आणि गवत अशा प्रकारच्या असंख्य पर्यटन स्थळांवर देखील सहज उतरु शकतात.

Pariksha Pe Charcha with PM Modi
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
9,200 oxygen concentrators, 5,243 O2 cylinders, 3.44L Remdesivir vials delivered to states: Govt

Media Coverage

9,200 oxygen concentrators, 5,243 O2 cylinders, 3.44L Remdesivir vials delivered to states: Govt
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
होमेन बोरगोहेन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
May 12, 2021
शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होमेन बोरगोहेन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

ट्वीट संदेशातून पंतप्रधान म्हणाले की, “होमेन बोरगोहेन  हे त्यांच्या आसामी साहित्य आणि पत्रकारितेतील समृध्द योगदानाबद्दल कायम स्मरणात राहतील. त्यांच्या कार्यातून आसामी लोकांचे जीवन आणि संस्कृती यांचे विविध पैलू दिसून येतात. त्यांच्या निधनामुळे मला अतीव दुःख होत आहे. त्यांचे कुटुंबीय आणि प्रशंसक यांच्या प्रती मी शोक संवेदना व्यक्त करतो. ओम शांती”