शेअर करा
 
Comments
PM undertakes aerial survey of flood affected areas in Bihar, announces relief package worth Rs.500 crores

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारच्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. यानंतर पूर्णिया येथे राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी तसेच वरिष्ठ अधिका-यांशी मदत कार्याविषयी चर्चा केली. यावेळी पूरग्रस्त बिहारला तातडीची मदत म्हणून 500 कोटी रुपये देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.

पुरामुळे झालेले नुकसान, सुरू असलेले मदत कार्य, पूरग्रस्तांचे पुनर्वसन याविषयी पंतप्रधानांनी सविस्तर माहिती घेतली. तसेच या आपत्तीमध्ये केंद्र सरकारकडून बिहारला सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान यांनी यावेळी दिले.

अतिवृष्टी, पुरामुळे बिहारमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे एक पथक तातडीने पाठवण्यात येईल, असे आश्वासन मोदी यांनी दिले. पीक विमा योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकरी बांधवांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांना विमा कंपन्यांनी तत्काळ पैसे देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देशही मोदी यांनी दिले.

पूरग्रस्त भागातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्यामुळे रस्ते परिवहन मंत्रालयाने रस्ते दुरूस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ज्या भागामध्ये विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे, तो सोडवण्यासाठी आणि लगेच वीज पुरवठा सुरू करण्यासाठी केंद्राकडून आवश्यक ती मदत पुरविण्यात येईल, असे मोदी यांनी सांगितले.

पुरामुळे मृत्यू पावलेल्या प्रत्येकाच्या वारसाला दोन लाख रुपये तर गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये आर्थिक मदत पंतप्रधान सहायता निधीमधून देण्यात येईल, असे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले.

अलिकडेच नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देवूबा यांच्या भारत भेटी दरम्यानसप्तकोसी नदीवर धरण बांधण्याचा आणि सुनकोसी प्रकल्प उभा करण्यासंबंधी उभय देशात करार झाले आहेत. या दोन्ही प्रकल्पांमुळे बिहारचा पूरप्रश्न काही प्रमाणात सुटू शकणार आहे.

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
India's textile industry poised for a quantum leap as Prime Minister announces PM MITRA scheme

Media Coverage

India's textile industry poised for a quantum leap as Prime Minister announces PM MITRA scheme
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM conveys Nav Samvatsar greetings
March 22, 2023
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has greeted everyone on the occasion of Nav Samvatsar.

The Prime Minister tweeted;

“देशवासियों को नव संवत्सर की असीम शुभकामनाएं।”