PM to visit Mizoram and Meghalaya tomorrow; will inaugurate various development projects
PM Modi to dedicate the Tuirial Hydropower Project to the nation in Aizawl
PM Modi to inaugurate the Shillong-Nongstoin-Rongjeng-Tura Road
We see immense potential in the Northeast and are committed to doing everything for the region’s overall progress: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मिझोराम आणि मेघालयाच्या दौऱ्यावर जाणार असून तिथे ते विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन करणार आहेत.

मोहक आणि आकर्षक ईशान्य प्रदेश मला साद घालत आहे! उद्याच्या मिझोराम आणि मेघालयाच्या दौऱ्याबाबत मी खूप विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन करणार आहे. या प्रकल्पांमुळे ईशान्येकडील राज्यांच्या विकास यात्रेला नवीन चालना मिळेल.

“आयजोल” येथे उद्यो होणाऱ्या एका कार्यक्रमादरम्यान मला ट्यूरिअल जलविद्युत प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्याची संधी मिळणार आहे हे माझे भाग्य आहे. हा प्रकल्प पूर्ण होणे म्हणजे मिझोरामच्या लोकांसाठी एक वरदान आहे.

युवा शक्तीला नवीन पंख देण्यासाठी डोनरने 100 कोटी रुपयांचा ईशान्य उद्यम भांडवल निधी उभारला आहे. उद्या या निधीतून उद्योजकांना मी धनादेश वितरित करणार आहे. ईशान्य राज्यातील युवकांमध्ये उद्योग भावना रुजणे हे या क्षेत्राच्या सक्षक्तीकरणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

शिलाँगमध्ये मी शिलाँग-नोंगस्टॉईन-रोंगजेंग-टूरा रस्त्याचे उद्‌घाटन करणार आहे. या प्रकल्पामुळे कनेक्टीव्हीटी वाढून आर्थिक विकासाला नवीन चालना मिळेल. मी एका जनसभेला संबोधित करणार आहे.

आम्हाला ईशान्येकडील प्रदेशात अमाप संधी खुणावत आहेत आणि या प्रदेशाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे पंतप्रधानांनी सांगितले.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
FPOs’ sales rise via commodity exchanges in FY26

Media Coverage

FPOs’ sales rise via commodity exchanges in FY26
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 मे 2026
May 11, 2026

Society Above Politics: PM Modi’s Call for a Stronger, Self-Reliant & Sacred Bharat