शेअर करा
 
Comments
Relationship between India and Uzbekistan goes back to a long time. Both the nations have similar threats and opportunities: PM
India and Uzbekistan have same stance against radicalism, separatism, fundamentalism: PM Modi

सन्माननीय महोदय, नमस्कार

सर्वात आधी मी  आपल्याला 14 डिसेंबर रोजी  आपण आपल्या कार्यकालाच्या 5 व्या वर्षात प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा देऊ इच्छितो.

मी या वर्षी उझ्बेकिस्तानच्या दौऱ्यासाठी उत्सुक होतो. कोविड-19 मुळे माझा दौरा होऊ शकला नाही, पण मला आनंद आहे की  ‘Work From Anywhere’ अर्थात कुठूनही काम करू शकण्याच्या   या काळात आज आपण व्हर्च्युअल माध्यमाच्या सहाय्याने भेटत आहोत.

सन्माननीय महोदय ,

भारत आणि उझ्बेकीस्तान दोन्ही समृद्ध संस्कृती आहेत. प्राचीन काळापासून निरंतर आपण एकमेकांच्या संपर्कात आहोत.

आपल्या क्षेत्राची आव्हाने आणि संधींच्या बाबतीत आपले विचार आणि  दृष्टिकोन यामध्ये बरेच साम्य आहे आणि म्हणूनच आपले संबध नेहमीच व्यवस्थित टिकून राहिल आहेत.

2018 आणि 2019 मध्ये आपल्या भारत दौऱ्यांच्या दरम्यान आपल्याशी अनेक मुद्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. ज्यामुळे आपल्या परस्परसंबधाना एक नवी गती मिळाल्याचे दिसून आले.

सन्माननीय महोदय ,

दहशतवाद, कट्टरता आणि फुटीरता या बाबतींमध्ये आपल्या समस्या सारख्याच आहेत. आपण उभयता दहशतवादाविरूद्ध एकत्र ठाम उभे आहोत. प्रदेशातील सुरक्षेच्या मुदद्यावरही आपला दृष्टीकोन एकसारखा आहे. अफगाणिस्तानात शांतता आणण्यासाठी एका अश्या प्रक्रियेची आवश्यकता आहे जी खुद्द अफगाणिस्तानच्या नेतृत्वाखाली, स्वामित्वात आणि नियंत्रणात असेल यावर आपण सहमत आहोत. मागील दोन दशकांत जे प्राप्त केले ते सुरक्षित राखणेही आवश्यक आहे.

भारत आणि उझ्वेकिस्तान ने एकत्र येऊन India-Central Asia Dialogue अर्थात  भारत- मध्य आशिया संवादाची  ची साद घातली होती. मागील वर्षी समरकंदमध्ये याचा आरंभ झाला होता.

सन्माननीय महोदय ,

मागील काही वर्षात आपली आर्थिक भागीदारीसुद्धा मजबूत झाली आहे.

आम्ही उझ्बेकिस्तानसह आपली  विकासविषयक भागीदारी  अजून दृढ करू इच्छितो.

भारताकडून देण्यात येणाऱ्या  Line of Credit  अर्थात पत  हमी अंतर्गत अनेक  प्रकल्पांबाबत विचार केला जात आहे, हे समजल्यावर मला आनंद झाला.

आपल्या विकासाच्या प्राथमिकतेनुसार आम्ही भारताचे  ज्ञान तसेच कौशल्य  आणि अनुभव सामायिक करण्यास तयार आहोत. पायाभूत सुविधा, माहिती  शिक्षण, आरोग्य,  प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी सारख्या क्षेत्रात भारत अधिक सक्षम आहे, ज्याचा उझ्बेकीस्तानला लाभ मिळू शकेल. आपल्यामध्ये शेतीशी  संबधित संयुक्त कार्यकारी गटाची स्थापना एक महत्वाचे आणि सकारात्मक पाऊल आहे. यामुळे आपण आपल्या कृषीसंबधीत व्यापार वाढवण्याच्या संधींचा शोध घेऊ  शकतो. ज्याचा उभय देशातील शेतकऱ्य़ांना लाभ मिळेल.

सन्माननीय महोदय ,

आपली संरक्षण भागीदारी म्हणजे द्विपक्षीय   संबधांचा एक मजबूत स्तंभ  बनत आहे. मागील वर्षी उभय देशाच्या  सशस्त्र दलांचा पहिला संयुक्त सैनिक सराव झाला. अंतराळ आणि अनु ऊर्जा  क्षेत्रांमध्ये आपल्या संयुक्त प्रयत्नाना बळकटी येत आहे. कोविड-19 महामारीच्या या कठीण काळात दोन्ही देशांनी औषधांचा पुरवठा करणे तसेच एकमेकांच्या नागरीकांना सुरक्षित स्वदेशात पोहोचवण्याच्या अशा अनेक  क्षेत्रात  एकमेकांना भरपूर सहकार्य केले. आपल्या  दोन्ही  देशांमध्ये सहकार्याच्या वाटा वाढत आहेत. गुजरात आणि अन्दिजों  यांच्यातील यशस्वी भागीदारीच्या धर्तीवर  आता हरयाणा आणि फरगाना यांच्यात सहकार्याची रूपरेषा आखली जात आहे.

सन्माननीय महोदय ,

आपल्या नेतृत्वाखाली उझ्बेकीस्तानात अनेक महत्वाचे बदल घडून येत आहेत आणि भारतातही आम्ही सुधारणांच्या मार्गावर ठाम आहोत.

यातून कोविडोत्तर काळात आपल्या दोहोंमधील परस्पर सहकार्यांच्या संधी वाढतील. मला विश्वास आहे की आजच्या आपल्या या चर्चेमुळे या प्रयत्नांना  नवी दिशा आणि उर्जा मिळेल,

सन्माननीय महोदय ,

मी आता आपणास उद्‌घाटनपर भाषण करण्यासाठी आमंत्रित करत आहे.

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
India’s blue economy sets sail to unlock a sea of opportunities!

Media Coverage

India’s blue economy sets sail to unlock a sea of opportunities!
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 जून 2023
June 07, 2023
शेअर करा
 
Comments

New India’s Journey Towards Growth, Progress and Stability Under PM Modi’s Leadership