PM Modi meets all Secretaries to the Government of India, reviews work done so far in several sectors
Ten new Groups of Secretaries to be formed who will submit reports on various Governance issues by end of November
PM Modi urges group of secretaries to prioritize harnessing the strengths of the 800 million youth of India

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्र सरकारच्या सेवेतल्या सर्व सचिवांची भेट घेतली. मंत्रिमंडळातले मंत्री आणि स्वतंत्र प्रभार असणारे राज्यमंत्रीसुध्दा या बैठकीला उपस्थित होते.

यावर्षी जानेवारी महिन्यात पंतप्रधानांसमोर सचिवांच्या 8 गटांनी सादर केलेल्या अहवालांचा पाठपुरावा म्हणून मुख्य सचिवांनी आतापर्यंत झालेल्या कामाचे संक्षिप्त सादरीकरण केले.


8पैकी 2 गटांच्या प्रतिनिधींनी आपापल्या गटांनी केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबतच्या सद्यस्थिती संदर्भातील सादरीकरण यावेळी केले.

सचिवांचे 10 नवे गट तयार करण्यात आले असून ते नोव्हेंबर अखेरपर्यंत प्रशासना संदर्भातील विविध मुद्दयांबाबतचे अहवाल सादर करणार आहेत. पूर्वीच्या गटांनी विशिष्ट संकल्पनांवर आधारित काम केले होते. या गटांचे लक्ष्य प्रामुख्याने कृषी, ऊर्जा, परिवहन अशा विविध क्षेत्रांवर असणार आहे.


सचिवांशी संवाद साधताना या जानेवारी महिन्यात आठ संकल्पनांवर आधारित गटांनी केलेल्या कामाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. आपण अभ्यास करत असलेल्या संबंधित क्षेत्रात केंद्र सरकारने केलेल्या कार्याचा कठोर आढावा घ्यावा, अशी विनंती पंतप्रधानांनी केली. संशोधनासंबंधी मुद्दयांमध्ये युवा अधिकाऱ्यांना सहभागी करुन घ्यावे, अशी सूचनाही त्‍यांनी केली.

लोकसंख्या शास्त्रीय विभागणी संदर्भात बोलतांना आपल्या शिफारशींमध्ये सर्व गटांनी देशातील 800 दशलक्ष युवकांच्या क्षमतांना प्राधान्याने विचारात घ्यावे, असे पंतप्रधानांनी सांगितले. केंद्र सरकारच्या सचिवांचे पथक देशाच्या नागरिकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने धोरणे तयार करण्यास अनुभवी आणि तज्ञ आहे, असे ते म्हणाले. आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Jan Aushadhi Kendras And India's Medical Revolution Under PM Modi

Media Coverage

Jan Aushadhi Kendras And India's Medical Revolution Under PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares Sanskrit Subhashitam emphasising on sacred Earth as a source of strength to the nation
March 10, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, shared a Sanskrit Subhashitam emphasising on sacred Earth as a source of strength to the nation:

“यार्णवेऽधि सलिलमग्र आसीद्यां मायाभिरन्वचरन्मनीषिणः।

यस्या हृदयं परमे व्योमन्त्सत्येनावृतममृतं पृथिव्याः।

सा नो भूमिस्त्विषिं बलं राष्ट्रे दधातूत्तमे॥”

The Subhashitam conveys that, the Earth, which is filled with water within the oceans, and surrounded by water outside, which thoughtful scholars have understood through their wisdom, and whose heart is covered by the eternal truth in the vast sky – may that earth, sustain our energy and strength in a noble nation.

The Prime Minister wrote on X;

“यार्णवेऽधि सलिलमग्र आसीद्यां मायाभिरन्वचरन्मनीषिणः।

यस्या हृदयं परमे व्योमन्त्सत्येनावृतममृतं पृथिव्याः।

सा नो भूमिस्त्विषिं बलं राष्ट्रे दधातूत्तमे॥”