शेअर करा
 
Comments
Our links with Malaysia have been civilizational and historic. Our relationship is rich and diverse: PM Modi
The contributions of a large Indian community in Malaysia are of special value. They have not only nurtured our shared heritage: PM
India and Malaysia have built a thriving economic partnership: PM Narendra Modi
India’s infrastructure needs and our ambitious vision of developing Smart cities match well with the Malaysian capacities: PM
The U.T.A.R. University of Malaysia has started Ayurveda degree courses in Malaysia for the first time. This is a welcome development: PM
Our (India and Malaysia) wide-ranging defence partnership has already brought our armed forces closer, says PM Modi

महामहीम पंतप्रधान दातो श्री मोहम्मद नजीब बिन तून अब्दुल रझाक, प्रसारमाध्यमातील सदस्य,

मलेशियाच्या पंतप्रधानांचे भारतात स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. महामहीम नजीब जी, नोव्हेंबर २०१५ मध्ये माझ्या मलेशिया दौऱ्या दरम्यान जो स्नेह आणि सदिच्छा मी अनुभवली तुमच्या या भारत भेटीमुळे मला आणि भारताच्या जनतेला तुमचे त्याच प्रकारे आदरातिथ्य करण्याची संधी लाभली आहे. आपल्या संबंधांच्या दृष्टीने तुमच्या या दौऱ्याला ऐतिहासिक महत्व देखील प्राप्त झाले आहे. आपण आपल्या राजकीय संबंध स्थापनेची ६० वर्ष साजरी करत आहोत. आणि तुमचे वैयक्तिक लक्ष आणि नेतृत्वामुळे या संबंधांना अधिक स्थिर दिशा, बळकटी आणि लवचिकता प्राप्त झाली आहे.

मित्रांनो, 

मलेशिया सोबत आपली सांस्कृतिक आणि ऐतिहासिक नाळ जोडली गेली आहे. आपले संबंध समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहेत. आपले समाज विविध पातळ्यांवर एकमेकांशी जोडले गेले आहेत. सांस्कृतिक आणि धार्मिक बंधांमुळे आपली जनता एकमेकांशी घट्ट जोडली गेली आहेत. मलेशियामध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करणाऱ्या भारतीय समाजाच्या योगदानाला विशेष महत्व आहे. त्यांनी केवळ आपला वारसा जतन केला नाही तर अर्थव्यवस्थेला बळकटी देखील प्रदान केली आणि उभय देशामधील लोकांना एकमेकांसोबत जोडून देखील ठेवले. माझ्या मागील दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नजीब आणि मी कोलाल्मवूर मधील तोरणा गेटचे संयुक्तपणे उद्‌घाटन केले होते. तोरणा गेटवरील सांची स्तूपाचे चिन्ह हे आपल्या अतूट मैत्रीचे प्रतिक आहे.

 

मित्रांनो,

आजच्या आमच्या व्यापक चर्चेमध्ये, पंतप्रधान नजीब आणि मी मिळून आपल्या सांस्कृतिक, आर्थिक आणि धोरणात्मक प्रतिबद्धतेंचा आढावा घेतला. नोव्हेंबर २०१५ मधील माझ्या मलेशिया दौऱ्या दरम्यान घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणी मधील प्रगतीचा आम्ही आढावा घेतला आणि आपली धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी वैचारिक दृष्टिकोनाचे आदान-प्रदान करण्यावर सहमती दर्शवली. दृष्टीकोन जो क्रियाभिमुखतेला प्राधान्य देईल. या प्रयत्नांमध्ये, सहकार्याच्या विद्यमान क्षेत्रांना अधिक मजबूत करणे आणि प्रतीबद्धतेचे नवीन क्षेत्र शोधणे ही आपली महत्वपूर्ण उदिष्टे आहेत.

मित्रांनो,

भारत आणि मलेशियाने जोमदार आर्थिक भागीदारी उभारली आहे. जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून हि भागीदारी अधिक वृद्धिंगत करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये भारत अनेक संधी उपलब्ध करून देत आहे. आणि, आपल्या समाजामध्ये समृद्धीचे नवीन मार्ग उभारण्यासाठी आम्ही उभय अर्थव्यवस्थांमधील व्यापार आणि भांडवली प्रवाह वाढविण्यासाठी आम्ही तयार आहोत. पायाभूत सुविधा हे आपल्या भागीदारीतील फलदायी क्षेत्र आहे परंतु आपण यामध्ये अजून प्रगती करू शकतो. भारतीय पायाभूत सुविधांची गरज आणि स्मार्ट शहर विकसित करण्याचे आपले महत्वाकांक्षी स्वप्न आणि मलेशियाची क्षमता हे एकमेकांना पूरक आहेत. भारतातील विविध राज्यांमधील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये मलेशियन कंपन्यांचा सहभाग आहे. भारतीय कंपन्या देखील मलेशियामध्ये कार्यरत असून त्यांनी मलेशियन अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक केली आहे. आम्हाला आनंद आहे की, पंतप्रधान नजीब यांच्यासोबत उच्च स्तरीय व्यापारी प्रतिनिधी मंडळ आहे. इतरांना मागे टाकत उभय देशांनी जी व्यावसायिक भागीदारी उभारली आहे ती अधिक मजबूत होईल आणि आपल्या व्यावसायिक प्रतिबद्धतेला गती प्राप्त होईल याबद्दल मला विश्वास आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या कल्याणाशी निगडीत असलेले अन्न सुरक्षेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करत आहोत. मलेशियामधील खत कारखान्याचा प्रस्तावित विकास सामंजस्य करार आणि मलेशिया मधील अतिरिक्त युरिया भारतात आणणे हे स्वागतार्ह विकासकार्य आहे.

मित्रांनो,

मलेशियाच्या यु.टी.ए.आर. विद्यापीठाने मलेशियामध्ये प्रथमच आयुर्वेद पदवी अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा स्वागतार्ह उपक्रम आहे. आणि त्याच विद्यापीठात आयुर्वेद प्राध्यापक पद स्थापन करण्याचे कार्य सुरु आहे. आपल्या शैक्षणिक देवाण-घेवाणीमुळे उभय देशातील लोकांचे बंध अधिक दृढ झाले आहेत. पदवीच्या परस्पर मान्यतेवरील सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या झाल्या यामुळे उभय देशातील विध्यार्थ्यांना याचा लाभ होईल.

मित्रांनो,

आपण अशा काळात आणि प्रदेशात रहात आहोत जिथे पारंपारिक आणि अपारंपरिक सुरक्षेचे धोके निरंतर उद्‌भवत राहतात. या आव्हानांमुळे आपल्या देशाचे तसेच प्रदेशाचे स्थैर्य आणि आर्थिक समृद्धीला धोका निर्माण होतो यावर पंतप्रधान नजीब आणि मी सहमती दर्शवली आहे, आणि याकरिता आपल्या प्रदेशातील देशांनी एकत्रितपणे या आव्हानांचा सामना करण्याची आवशक्यता आहे. या अनुषंगाने, आपल्या संयुक्त दहशतवाद विरोधी प्रयत्नांमध्ये मलेशियन सरकार सोबतच्या निरंतर सहकार्याची मी प्रशंसा करतो.

महामहीम, मुलवाद आणि दहशतवादा विरूद्धचे तुमचे स्वतःचे नेतृत्व हे संपूर्ण प्रदेशासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या विस्तृत संरक्षण भागीदारीमुळे उभय देशाच्या सैन्याला जवळ आणले आहे.

आपण सहकार्य करत आहोत:

• प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी;

• अवजारांची देखभाल आणि लष्करी हार्डवेअर;

• सागरी सुरक्षा; आणि

• आपत्ती प्रतिसाद.

आर्थिक समृद्धीला चालना देणे, जलपर्यटनाचे स्वातंत्र्य आणि आशिया प्रशांत प्रदेशात आणि विशेषतः त्याच्या समुद्रात स्थैर्य निर्माण करण्यामधील आमच्या भूमिकेबद्दल आणि जबाबदारीबद्दल पंतप्रधान नजीब आणि मी सजग आहोत. आपल्या समाजाला सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि अधिक चांगल्या प्रदेशासाठी, आमच्या सामायिक चिंता आणि आव्हानांना परिणामकारकरीत्या हाताळण्यासाठी आपल्या धोरणात्मक भागीदारीला अधिक बळकट करण्यावर आम्ही सहमती दर्शवली आहे.

महामहीम पंतप्रधान नजीब,

मी तुमचे पुन्हा एकदा भारतात स्वागत करतो. आपल्यामधील फलदायी चर्चेबद्दल मी आभारी आहे. मला विश्वास आहे की, आज आपल्यामध्ये झालेल्या चर्चेमुळे आपली धोरणात्मक भागीदारी पुढील स्तरावर जाईल. भारतामध्ये तुमच्या आनंददायक आणि फलदायी मुक्कामाची मी कामना करतो.

धन्यवाद
खूप खूप धन्यवाद.

Inspire India's Olympians! #Cheers4India
Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Exports hit record high of $35 bn in July; up 34% over pre-Covid level

Media Coverage

Exports hit record high of $35 bn in July; up 34% over pre-Covid level
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Our Men’s Hockey Team at Tokyo 2020 gave their best and that is what counts: PM
August 03, 2021
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has said that our Men’s Hockey Team at Tokyo 2020 gave their best and that is what counts. He also wished the Team the very best for the next match and their future endeavours.

In a tweet, the Prime Minister said;

"Wins and losses are a part of life. Our Men’s Hockey Team at #Tokyo2020 gave their best and that is what counts. Wishing the Team the very best for the next match and their future endeavours. India is proud of our players."