शेअर करा
 
Comments
PM holds talks with French President Emmanuel Macron in Paris

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅरिस येथे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. बैठकीनंतर पंतप्रधानांनी प्रसार माध्यमांना संबोधित केले. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी केलेल्या स्वागताबद्दल त्यांचे आभार मानत पंतप्रधानांनी निवडणुकीतील यशाबद्दल राष्ट्राध्यक्षांचे अभिनंदन केले.

गेल्या काही वर्षांमध्ये फ्रान्स भारत संबंध मानवतेप्रती सेवा आणि मानवी मूल्यांच्या माध्यमातून यशस्वीरित्या दृढ झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. हे संबंध भविष्यात आधिक दृढ होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या संदर्भात पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि या कारणासाठी भारत आणि फ्रान्सचे संयुक्त प्रयत्न, या बाबींचा उल्लेख केला.  

हवामानविषयक पॅरिस करार हा संपूर्ण जगासाठी सामायिक वारसा असल्याचे सांगत मानवाच्या आगामी पिढयांच्या दृष्टीने या पिढीचे हे आशादायक योगदान असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पृथ्वीचे संरक्षण करणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पॅरिस हा आपल्या राजकीय प्रवासातून महत्वाचा भाग असल्याचे नमूद करत या करारासाठी भारत आणि फ्रान्सने खांद्याला खांदा लावून काम केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. पर्यावरणाचे रक्षण हा भारतीयांसाठी विश्वासाचा विषय असून ती शतकापूर्वीची जुनी प्रथा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

सुसंवाद राखण्याप्रती भारत वचनबध्द असल्याचे सांगत भावी पिढयांना चांगली भेट देण्याच्या दृष्टीने भारत इतरांसोबत सातत्याने प्रयत्नशील राहतो, असे त्यांनी सांगितले.

दोन्ही देशांच्या नेत्यांनी दहशतवाद आणि मूलगामी वृत्तीशी लढा देण्यासंदर्भात चर्चा केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. युरोपियन युनियनच्या विकासाप्रती भारत संवेदनशील असल्याचे पंतप्रधान म्हणाले.  

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
जम्मू काश्मीरच्या नौशेरा जिल्ह्यात भारतीय सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी सैनिकांसोबत साधलेला संवाद

लोकप्रिय भाषण

जम्मू काश्मीरच्या नौशेरा जिल्ह्यात भारतीय सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी सैनिकांसोबत साधलेला संवाद
How does PM Modi take decisions? JP Nadda reveals at Agenda Aaj Tak

Media Coverage

How does PM Modi take decisions? JP Nadda reveals at Agenda Aaj Tak
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Social Media Corner 5th December 2021
December 05, 2021
शेअर करा
 
Comments

India congratulates on achieving yet another milestone as Himachal Pradesh becomes the first fully vaccinated state.

Citizens express trust as Govt. actively brings reforms to improve the infrastructure and economy.