Poorvanchal Expressway would transform the towns and cities that it passes through: PM Modi
Connectivity is necessary for development: PM Narendra Modi
Sabka Saath, Sabka Vikaas is our mantra; our focus is on balanced development: PM
PM Modi slams opposition for obstructing the law on Triple Talaq from being passed in the Parliament

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधल्या आझमगड येथे पूर्वांचल द्रुतगती मार्गाचे आज भूमीपूजन केले.

राज्याच्या विकासाच्या प्रवासातला विकासाचा हा नवा अध्याय असल्याचे पंतप्रधानांनी यानंतर एका जनसभेला संबोधित करताना सांगितले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करत, राज्यात विकासाला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

समाजातल्या विविध घटकांच्या प्रगतीसाठी राज्य सरकार कार्यरत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 340 किलोमीटर लांबीचा पूर्वांचल द्रुतगती मार्ग ज्या शहरातून जाणार आहे त्या शहरांचा संपूर्ण कायापालट घडणार असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली. या मार्गामुळे दिल्ली-गाझीपूर दरम्यान रस्ते मार्ग संपर्क जलद होणार आहे.

 या द्रुतगती महामार्गादरम्यान नवे उद्योग आणि संस्था विकसित करता येतील असे सांगून या प्रदेशातल्या ऐतिहासिक महत्व असलेल्या स्थळांच्या पर्यटनालाही हा द्रुतगती मार्ग चालना देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सध्याच्या काळात विकासासाठी दळणवळण हे आवश्यक आहे. गेल्या चार वर्षात उत्तरप्रदेशातले राष्ट्रीय महामार्गाचे जाळे जवळपास दुप्पट झाल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात हवाई संपर्क आणि जलमार्ग संपर्काबाबतचा तपशीलही पंतप्रधानांनी सादर केला. देशाचा पूर्वेकडचा भाग, विकासाचा नवा कॉरिडॉर बनावा यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Click here to read PM's speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
BrahMos and beyond: How UP is becoming India’s defence capital

Media Coverage

BrahMos and beyond: How UP is becoming India’s defence capital
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi shares Sanskrit Subhashitam emphasising the importance of Farmers
December 23, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi, shared a Sanskrit Subhashitam-

“सुवर्ण-रौप्य-माणिक्य-वसनैरपि पूरिताः।

तथापि प्रार्थयन्त्येव कृषकान् भक्ततृष्णया।।”

The Subhashitam conveys that even when possessing gold, silver, rubies, and fine clothes, people still have to depend on farmers for food.

The Prime Minister wrote on X;

“सुवर्ण-रौप्य-माणिक्य-वसनैरपि पूरिताः।

तथापि प्रार्थयन्त्येव कृषकान् भक्ततृष्णया।।"