शेअर करा
 
Comments
PM Modi lays foundation stone for 'National Tribal Freedom Fighters' Museum in Dhaboi
We remember our freedom fighters from the tribal communities who gave a strong fight to colonialism: PM
Sardar Sarovar Dam would positively impact the lives of people in Gujarat, Maharashtra and Madhya Pradesh: PM Modi
It is because of Sardar Patel we are realising the dream of Ek Bharat, Shreshtha Bharat: PM Modi
The Statue of Unity will be a fitting tribute to Sardar Patel and will draw tourists from all over: PM
India would never forget the excellent leadership of Marshal of the IAF Arjan Singh in 1965: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार सरोवर धरणाचे राष्ट्रार्पण केले. यावेळी केवडिया येथे धरणापाशी प्रार्थना आणि मंत्र म्हटले गेले. पंतप्रधानांनी कोनशिलेचे अनावरणही केले.  

त्यानंतर पंतप्रधानांनी सरदार सरोवर धरणापासून काही अंतरावरच असलेल्या साधू बेटावर बांधकाम सुरु असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्मृतिस्थळाला भेट दिली. या कामाच्या प्रगतीबद्दल पंतप्रधानांना माहिती देण्यात आली.

डभोई इथे मोठ्या जनसभेत पंतप्रधानांनी राष्ट्रीय आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयासाठी पायाभरणी केली. नर्मदा नदीबाबत गुजरातच्या विविध जिल्ह्यात जागरुकता निर्माण करण्यासाठी आयोजित नर्मदा महोत्सवाचा सांगता समारंभ यावेळी झाला. एवढ्या मोठ्या संख्येने जमलेला जनसमुदाय समाजात माता नर्मदे विषयी असलेला आदरभाव दर्शवत आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून आपण राष्ट्र बांधणीसाठी काम करत असलेल्या सर्वांना वंदन करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

 सरदार पटेल यांचे धरणाबाबतचे विचार पंतप्रधानांनी उद्‌धृत केले. सरदार पटेल आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सिंचनावर खूप भर दिला होता, असे पंतप्रधानांनी सांगितले.

जलस्रोतांचा अभाव हा विकासातला मोठा अडथळा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पूर्वी सीमाभागात भेट देत असताना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची आठवण त्यांनी सांगितली. सीमाभागातल्या या जवानांसाठी आम्ही नर्मदेचे पाणी आणले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

 

सरदार सरोवर धरण उभारणीत गुजरातच्या संत आणि द्रष्टे यांनी मोठी भूमिका बजावली आहे. नर्मदा नदीच्या पाण्यामुळे नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडेल, असे ते म्हणाले.

 

देशाच्या पश्चिम भागात पाण्याची टंचाई आहे, तर पूर्व भागात वीज आणि गॅसचा तुटवडा आहे. यावर मात करुन देशाला विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी सरकार काम करत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

 

एकतेचा पुतळा सरदार पटेलांसाठी मानवंदना ठरेल आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल. वसाहतवादाविरुद्ध लढा दिलेल्या आदिवासी समुदायातल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना पंतप्रधानांनी यावेळी उजाळा दिला.

 

Click here to read full text speech

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Mann KI Baat Quiz
Explore More
जम्मू काश्मीरच्या नौशेरा जिल्ह्यात भारतीय सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी सैनिकांसोबत साधलेला संवाद

लोकप्रिय भाषण

जम्मू काश्मीरच्या नौशेरा जिल्ह्यात भारतीय सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी सैनिकांसोबत साधलेला संवाद
India Inc raised $1.34 billion from foreign markets in October: RBI

Media Coverage

India Inc raised $1.34 billion from foreign markets in October: RBI
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 3 डिसेंबर 2021
December 03, 2021
शेअर करा
 
Comments

PM Modi’s words and work on financial inclusion and fintech initiatives find resonance across the country

India shows continued support and firm belief in Modi Govt’s decisions and efforts.