Jhunjhunu: PM Narendra Modi launches expansion of Beti Bachao, Beti Padhao movement and National nutrition Mission
PM Narendra Modi strongly pitches for treating daughters and sons as equal
Daughters are not burden, they are our pride: PM Narendra Modi

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज राजस्थानमध्ये झुनझुनु येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘राष्ट्रीय पोषण मोहिमे’चे उद्‌घाटन केले आणि ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रमाचा विस्तार केला.

यावेळी पंतप्रधानांनी संबंधित जिल्ह्यांमध्ये जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रमातील लाभार्थी महिला आणि बालिकांशीही पंतप्रधानांनी संवाद साधला.

बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.  

एका महत्वपूर्ण योजनेचे उद्‌घाटन करण्यासाठी आणि दुसऱ्या योजनेचा विस्तार करण्यासाठी पंतप्रधानांनी राजस्थानची निवड केली, ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे, असे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी यावेळी सांगितले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान करत असलेल्या प्रयत्नांना राजस्थान नेहमीच सहाय्य करेल, असेही त्या म्हणाल्या.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण देश झुनझुनुशी जोडला गेला आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. बेटी बचाओ बेटी पढाओ चळवळ पुढे नेणाऱ्या झुनझुनु जिल्ह्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले. लिंगाधारीत भेदभावाचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले.

मुलांप्रमाणेच मुलींनाही सगळीकडे दर्जेदार शिक्षण मिळणे महत्वाचे आहे, असे पंतप्रधानांनी आग्रहपूर्वक सांगितले.

मुलगी हे ओझे नाही, असे सांगत अनेक क्षेत्रांमध्ये मुलींनी आपल्या कर्तृत्वाने देशाचा सन्मान आणि गौरव वाढवला आहे, असे ते म्हणाले.

बालकांना योग्य पोषण प्राप्त होण्याच्या महत्वाबाबतही पंतप्रधानांनी आग्रही मत व्यक्त केले. मिशन इंद्रधनुष्यने महिला आणि बालकांच्या आयुष्यात अतिशय सकारात्मक बदल घडवून आणल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

Click here to read full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How ODOP is helping Pratapgarh turn its amla into a bigger business

Media Coverage

How ODOP is helping Pratapgarh turn its amla into a bigger business
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 1 सप्टेंबर 2026
September 01, 2026

#ModiHaiTohMumkinHai: Economy, Diplomacy and Atmanirbhar Milestones in One Social-Media Sweep