शेअर करा
 
Comments
Mudra Yojana has become a job multiplier: PM Modi
Mudra Yojana has helped in relieving the entrepreneurs from the vicious cycle of moneylenders and middlemen: PM Modi
Mudra Yojana has opened up new opportunities for youth, women and those who wanted to start or expand their businesses: PM Modi
Mudra Yojana has transformed the lives of the poor: PM Modi
By aiding small and micro businesses, Mudra Yojana has helped to strengthen people economically, socially and has given people a platform to succeed: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ ब्रिजच्या माध्यमातून देशभरातील मुद्रा योजना लाभार्थ्यांशी संवाद साधला. सरकारी योजनांच्या विविध लाभार्थ्यांसोबत संवाद साधण्याच्या पंतप्रधानांच्या व्हिडिओ ब्रिज श्रृंखलेतील ही दुसरी व्हिडिओ कॉन्फरन्स आहे.

लाभार्थ्यांशी संवाद साधतेवेळी आपला आनंद व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, मुद्रा योजना ही नोकरी देणारी बनली आहे. या उपक्रमामुळे उद्योजकांना सावकार आणि दलालांच्या दुष्टचक्रातून बाहेर पडायला मदत होत आहे. यामुळे युवक, महिला आणि आपला नवीन व्यवसाय सुरू अथवा त्याचा विस्तार करू इच्छिणाऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध आहेत.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत 12 कोटी रुपये कर्जापैकी 5.75 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले आहे. यापैकी 28 टक्के म्हणजेच 3.25 लाख कोटी रुपयांचे कर्ज हे नव उद्योजकांना दिले आहे. एकूण वितरीत कर्जापैकी 74 टक्के महिला लाभार्थी आहेत तर 55 टक्के कर्ज हे अनुसूचित जाती/जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजातील लोकांना देण्यात आले आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजना लाभार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, या योजनेमुळे गरिबांच्या जीवनात परिवर्तन घडून आले आहे. छोट्या आणि लघु व्यवसायांना सहाय्य करून ही योजना लोकांना आर्थिक, सामाजिकदृष्ट्या बळकट करत आहे आणि लोकांना यशस्वी होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.

स्वयं-रोजगार निर्मितीवर जोर देताना पंतप्रधान म्हणाले की, स्वयं-रोजगार निर्मिता असणे ही आता अभिमानाची बाब झाली आहे. याआधी अशक्य असणाऱ्या गोष्टी साध्य करण्यासाठी लोकांना मदत करत आहे.

संवादादरम्यान पंतप्रधान म्हणाले की, मुद्रा योजना काही वर्षांआधी लागू केली असती तर लाखो लोकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करायला मदत झाली असती आणि यामुळे स्थलांतर मोठ्या प्रमाणात थांबले असते.

पंतप्रधानांशी संवाद साधतांना लाभार्थ्यांनी सांगितले की, मुद्रा योजनेमुळे स्वत:चा व्यवसाय सुरू करायला त्यांना कशी मदत झाली आणि त्यामुळे इतरांसाठी रोजगार कशा प्रकारे उपलब्ध झाला.

8 एप्रिल 2015 रोजी पंतप्रधानांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत नॉन कॉर्पोरेट, छोट्या आणि लघु उद्योजकांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. व्यावसायिक बँका, आरआरबीएस, छोट्या वित्त बँका, सहकारी बँका, एमएफआयएस आणि एनबीएफसीएस हे कर्ज वितरीत करतात.

Click here to read full text speech

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Mohandas Pai Writes: Vaccine Drive the Booster Shot for India’s Economic Recovery

Media Coverage

Mohandas Pai Writes: Vaccine Drive the Booster Shot for India’s Economic Recovery
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मिडिया कॉर्नर 26 ऑक्टोबर 2021
October 26, 2021
शेअर करा
 
Comments

PM launches 64k cr project to boost India's health infrastructure, gets appreciation from citizens.

India is making strides in every sector under the leadership of Modi Govt