शेअर करा
 
Comments
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील, 60 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 81 प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभात उपस्थित
काळजी घेणारे सरकार या नात्याने आमचे उद्दीष्ट लोकांच्या जीवनातील अडचणी दूर करणे, आणि त्यांच्या जीवनात सुगमता सुधारणे हे आहे: पंतप्रधान मोदी
सध्याच्या सरकारच्या अंतर्गत गेल्या पाच महिन्यांत उत्तर प्रदेशांतील प्रकल्प ज्या वेगाने पुढे गेले ते प्रशंसनीय आहे : पंतप्रधान मोदी
गुंतवणुकीच्या प्रकल्पांतून अनेक नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि समाजातील विविध वर्गांना फायदा होईल: पंतप्रधान मोदी

उत्तर प्रदेशातल्या 81 प्रकल्पांचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज लखनौ इथे झाले. 60000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे हे प्रकल्प आहेत.

राज्यात औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी फेब्रुवारी 2018 मधे आयोजित करण्यात आलेल्या उत्तर प्रदेश गुंतवणूकदार परिषदेनंतरच्या काही महिन्यातच या प्रकल्पांना मूर्त स्वरुप मिळण्यासाठी चालना प्राप्त झाली.

देशाच्या काही भागात झालेल्या अतीवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर केंद्र सरकार लक्ष ठेऊन असून, बाधितांना मदत पुरवण्यासाठी राज्य सरकारांसमवेत काम करत आहे. जनतेच्या जीवनातल्या अडचणी दूर करुन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. आजचा हा मेळावा म्हणजे उत्तर प्रदेशचा कायापालट घडविण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे. प्रस्तावापासून भूमीपूजनापर्यंत ज्या गतीने या प्रकल्पांचा पाच महिन्यात प्रवास झाला आहे. तो प्रशंसनीय आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या कामगिरीबद्दल त्यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले. हे प्रकल्प राज्याच्या केवळ विशिष्ट भागापुरते मर्यादित राहिले नाहीत तर त्यामधे विकासाचा समतोल राखण्यात आला आहे.

राज्य शासनातल्या नव्या कार्यसंस्कृतीची त्यांनी प्रशंसा केली. गुंतवणुकीसंदर्भात बदललेल्या चित्रामुळे राज्यात रोजगाराच्या संधी व्यापार, उत्तम रस्ते, पुरेसा वीज पुरवठा यासह उज्वल भविष्याच्या संधी निर्माण झाल्या आहेत. हे प्रकल्प रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणार असून, समाजाच्या विविध घटकांना याचा लाभ होणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया या सारख्या उपक्रमांना, या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले. ग्रामीण भागातल्या तीन लाख सामाईक सेवा केंद्रामुळे, जनतेला प्रभावी आणि पारदर्शी सेवा मिळून ग्रामीण भागातल्या जनतेच्या जीवनात परिवर्तन घडत आहे. तोडगा काढण्यावर आणि समन्वयावर केंद्र सरकारचा भर आहे.

भारत हा जगातला मोबाईल फोनची निर्मिती करणारा दुसरा मोठा देश ठरला असला, या उत्पादन क्रांतीमधे उत्तर प्रदेश अग्रस्थानी आहे. पायाभूत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, भारतात व्यापार करणे अधिक सुलभ होणार असून, वाहतूक खर्चातही कपात होईल, उद्योजकांनी आणि व्यापाऱ्यांनी डिजिटल व्यवहारांना प्राधान्य द्यावे.

देशातल्या विद्युतीकरणासाठी सरकारने उचललेल्या पावलांविषयी त्यांनी माहिती दिली. देश, पारंपरिक उर्जेकडून हरित उर्जेकडे वाटचाल करत असून, उत्तर प्रदेश हे सौर ऊर्जेचे केंद्र ठरेल. देशाच्या ऊर्जा क्षेत्रातली तूट 2013-14 मधल्या 4.2 टक्क्यावरुन कमी होऊन ती आता एक टक्क्यापेक्षाही कमी झाली आहे.

नव भारताचा पथदर्शी आराखडा म्हणजे जन भागिदारीतून जनतेच्या आशा-आकांक्षाची पूर्तता असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 

Click here to read full text speech

Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Forex reserves cross $600 billion mark for first time

Media Coverage

Forex reserves cross $600 billion mark for first time
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM condoles demise of Swami Shivamayanandaji Maharaj of Ramakrishna Math
June 12, 2021
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed grief over the demise of Swami Shivamayanandaji Maharaj of Ramakrishna Math.

In a tweet, the Prime Minister said, "Swami Shivamayanandaji Maharaj of the Ramakrishna Math was actively involved in a wide range of community service initiatives focused on social empowerment. His contributions to the worlds of culture and spirituality will always be remembered. Saddened by his demise. Om Shanti."