PM Modi flags off 'Run for Unity’

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत पटेल चौक येथे सरदार पटेल यांच्या पुतळयाला पुष्पांजली अर्पण केली.

त्यानंतर पंतप्रधानांनी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथून “एकता दौड”ला हिरवा झेंडा दाखवला.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी सरदार पटेलांचे योगदान, विशेषत: देश अखंड राखण्यातील योगदानाचा विशेष उल्लेख केला.

भारतातील तरुण सरदार पटेल आणि राष्ट्र निर्मितीत त्यांनी दिलेल्या योगदानाचा आदर करतात असे पंतप्रधान म्हणाले.

भारताला आपल्या विविधतेचा अभिामान आहे आणि एकता दौड सारखे प्रसंग अभिमान आणि एकतेची भावना पुन्हा दृढ करण्याची संधी आपल्याला देतात असे पंतप्रधान म्हणाले.

 माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची आज पुण्यतिथी असून नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्मरण केले.

पंतप्रधानांनी एकता दौडमध्ये सहभागी झालेल्याना शपथ दिली.

Click here to read full text of speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi inaugurates Northeast’s first Emergency Landing Facility in Moran. Why it matters?

Media Coverage

PM Modi inaugurates Northeast’s first Emergency Landing Facility in Moran. Why it matters?
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 फेब्रुवारी 2026
February 15, 2026

Visionary Leadership in Action: From AI Global Leadership to Life-Saving Reforms Under PM Modi