शेअर करा
 
Comments
PM Narendra Modi addresses the National Youth Day in Greater Noida via video conferencing
Our ISRO scientists have made us proud yet again, ISRO today created a century in satellite launching: PM
Our strides in space will help our citizens & enhance our development journey, says PM Modi
People say today's youth don't have patience, in a way this factor becomes a reason behind their innovation: PM
I had called for organising mock parliaments in our districts, such mock parliaments will further the spirit of discussion among our youth, says the PM

आपल्या वैज्ञानिकांच्या अजून एका मोठ्या कामगिरीबद्दल मी सर्वात आधी सर्व देशवासीयांचे अभिनंदन करतो. नुकतंच इस्रो पीएसएलव्ही-  सी40 चे यशस्वी प्रक्षेपण केले. 

पीएसएलव्ही च्या माध्यमातून कार्टोसैट-2 श्रुंखलेतील उपग्रहासह एकूण 31 उपग्रह अंतराळात स्थापित करण्यात आले आहेत. आज इस्रो ने अजून एका विक्रमाची नोंद केली.आज इस्रो ने उपग्रह प्रक्षेपणात शतक झळकावले आहे. 

इस्रोच्या आजच्या यशामुळे देशातील शेतकऱ्यांनामच्छिमारांना प्राथमिक माहिती मिळण्यास सहकार्य मिळेल. 

हे यश नवं भारताच्या निर्मितीचा मार्ग अजून प्रशस्त करेल. 

आपल्या देशाचा मान उंचवणाऱ्या आणि देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या इस्रोच्या वैज्ञानिकांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. 

नवीन वर्षातविवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनी आपल्या वैज्ञानिकांनी देशाला एक अमूल्य भेट दिली आहे. 

मित्रांनोतुमच्याशी समोरासमोर बोलण्याची खूप इच्छा होती

हा जो छोटा भारत आता ग्रेटर नोएडा मध्ये एकत्र आला आहे

एक भारत- 

महान भारताचे भव्य चित्र सादर करत आहेह्या मिनी इंडियाचे साक्षात दर्शन झाले असते. 

परंतु कामाच्या व्यस्थतेमुळे तुम्हा लोकांशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवाद साधत आहे. 

मी नेहमी प्रयत्न करतो कीअशा कार्यक्रमांना जेव्हा मला जातीने हजर राहता येत नाही तेव्हा मी तिथे काय झालेकाय चर्चा झालीकाय निष्पन्न झाले याची सर्व माहिती प्राप्त करून घेतो.

 

तुम्ही देखील इथे जी चर्चा करालपरिसंवाद होतील त्याची पूर्ण माहिती घेण्याचा मी प्रयत्न करेन.

 

मित्रांनोआजपासूनच राष्ट्रीय युवा महोत्सवाची देखील सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या विध्यार्थी आणि संस्थांचे मी कौतुक करतोत्यांचे अभिनंदन करतो.

 

आगामी 4 दिवसात इथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेराष्ट्रीय युवा परिषदेचे देखील आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मला देण्यात आली. मी यावेळी “मन की बात” कार्यक्रमात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात मॉक परिषदेचे आयोजन करण्याचा विचार मांडला होता. ही त्याच विचाराची एक श्रुंखला आहे.

 

नवं भारताच्या विषयावर विचार मंथन करण्याचा संकल्प करायची ही एक उत्तम संधी आहे. हा 22 वा महोत्सव आहे आणि मला असे वाटते की जेव्हा तुम्ही चर्चा करालतेव्हा तुम्ही यावर देखील विचार मंथन करा की जेव्हा 25 व युवा महोत्सव साजरा होईलतेव्हा त्याचे स्वरूप काय असेल. संकल्प।काय असतीलआपण पथदर्शक तयार करून कुठे पोहचू?

 

याचप्रकारे जेव्हा देश 2022 मध्ये स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करणारत्या वाराही युवा महोत्सवाचे स्वरूप काय असेलयावर देखील तुम्ही चर्चा करा. मला खात्री आहे कीया चार दिवसांमध्ये तुम्ही अशी चर्चा कराल जी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हला दिशा दाखवेलतुम्हाला मार्गदर्शन करेल.

 

6-7 महीनों में आपने ये शब्द बार बार सुने होंगे। संकल्प से सिद्धिआखिर ये है क्या?

 

माझ्या युवा मित्रांनोया वर्षी महोत्सवाची संकल्पना  आहे “संकल्प से सिध्दी”. मागील 6-7 महिन्यांपासून हे शब्द तुम्ही वारंवार ऐकले असतील. संकल्प से सिध्दीहे नक्की काय आहे?

 

हा काही मोबाईलचा ॲप नाही की डाऊनलोड केलाइन्स्टॉल केला आणि मग झाले.

 

म्हणूनच आज मी तुमच्या सोबत संकल्प आणि त्याची सिद्धी यावर तुमच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे.

 

संकल्प नक्की काय आहेकाय सिद्ध करायचे आहे?

 

मित्रांनो,

 

2022 मध्ये आपला देश स्वातंत्र्याची 75 वी साजरी करणार आहे. तुम्ही स्वातंत्र्याच्या लढ्याबद्दल केवळ पुस्तकांमध्येच वाचलं असेल. मी देखील स्वातंत्र्य लढ्याबद्दल केवळ ऐकले आणि वाचले आहेम्हणूनच आपल्यात वयाचे अंतर जरी असले तरी या विषयातील आपले ज्ञान सारखेच आहे.

 

माझ्या युवा मित्रांनोआपण स्वतंत्रता संग्रामात सहभागी नव्हतो झालोआणि म्हणूनच स्वातंत्र्य वीरांनी त्यावेळी जी स्वप्न बघितली होती ती पूर्ण करण्याची खूप मोठी जबाबदारी आपल्यावर आहे.

 

जेव्हा तुरुंगात ब्रिटिश पोलीस स्वातंत्र्य सैनिकांवर चाबकाचे फटके मारत होतेत्यावेळी त्या काळकोठडीत हे सर्व ते निमूटपणे सहन करत आपले स्वातंत्र्य वीर जे भारताचे स्वप्न बघत होतेत्या भारताची निर्मिती करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

 

जेव्हा आपण त्या कल्पनेलात्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने अनुभवू तेव्हाच त्यांच्या स्वप्नातील भारत निर्मितीचा संकल्प देखील करू शकू. हा भारत कसा असेलनवं भारत कसा असेलआज जेव्हा तुम्ही दिवसभराचे कार्यक्रम संपवून रात्री झोपायला जाल तेव्हा थोडावेळ या सर्वाचा विचार करा.

 

विचार करा की तुमच्या आसपास असे काय घडत आहे जे तुम्हाला बदलायचे आहे.

 

 

 

अशी कोणती प्रणाली आहे जिच्याबद्दल तुम्ही विचार करत होतात कीहे बरोबर नाही,ही परिस्थिती बदलली तर!!! जेव्हा तुम्ही ट्रेनने इथे येत असालशाळेतमहाविद्यालयात,घरातजेव्हा पण तुम्ही विचार कराल की हे ठीक नाहीहे तर बदलायला हवंत्याचा तुम्ही आज पुन्हा विचार करा

 

एकदा का एखादी गोष्ट होऊन गेली की त्याचा पुन्हा विचार करा. विवेकानंदांचे स्मरण करामी विश्वासाने सांगतोज्या गोष्टी तुम्ही अनुभवल्या आहेतज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास झाला आहेज्या बदलण्याचा विचार तुमच्या मनात आला आहेजर तुम्ही आज त्याच्यासोबत स्वतःला जोडलेत तर तीच इच्छा एक संकल्प बनेल.

 

आज 12 जानेवारीच्या रात्री त्याच गोष्टी तुमच्यासाठी संकल्प होतील. संकल्प कोणाला सांगण्यासाठी नाहीजोरजोरात ओरडून सांगण्यासाठी नाहीतर हा संकल्प तुमच्या स्वतःसाठी असेल13 जानेवारीच्या नवीन पहाटेपासूननवीन उमेदीने काम करण्यासाठी असेल.

मित्रांनोतुम्हींसर्व आता ज्या विद्यापीठाच्या परिसरात आहातते गौतम बुद्धांच्या नावावर आहे.

 

तुम्ही ज्या शहरात आहात- ग्रेटर नोएडा- त्याचे नाव देखील गौतम बुद्ध नगर आहे. म्हणूनच मी तुम्हाला गौतम बुद्धांशी निगडित एक गोष्ट सांगतो. छोटासा किस्सा आहेखूप काही मोठा नाही.

 

एकदा भगवान बुद्धांच्या एका शिष्याने त्यांना विचारले कीतुमच्याकडून शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक शिष्याला मुक्ती मिळणार काभगवान बुद्धांनी उत्तर दिले- नाहीकाही जणांनाच मिळेल.

 

काहींना नाही मिळणार. शिष्याने विचारले- असे कातेव्हा भगवान बोलले की जे माझ्या वाचनांना योग्य पद्धतीने समजून घेतलीत्यांनाच मुक्ती मिळेलबाकी भटकत राहतील.

 

मित्रांनोएका गुरूकडून आपल्याला एकच शिक्षण मिळेलपरंतु तुम्ही ते शिक्षण कसे ग्रहण करतातुम्ही काय संकल्प करतात्यावर तुमचे यश आणि अपयश अवलंबून आहे.

 

बघाजसे कौरव आणि पांडवांचे गुरू एकच होते.

 

दोघांना एकाच प्रकारचे शिक्षण मिळाले होतेपरंतु दोघांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व किती वेगळे होते. कारण कौरव आणि पांडवांचे संकल्प वेगवेगळे होते.

 

आयुष्यात तुम्हाला शिक्षण देणारे खूप लोकं मिळतीलपरंतु शिक्षण ग्रहण करून कोणत्या मार्गावर चालायचे आहेकोणता संकल्प करायचा आहेहे फक्त तुम्हालाच ठरवावे लागेल.

 

हाच तर गौतम बुद्धांच्या “अप्प दीपो भव:” चे देखील सार आहे. आपला दिवाआपला प्रकाश स्वतः बना. तुमचे संकल्प तुम्ही स्वतः करा. कोणी तुम्हाला शपथ घालायला नाही येणारकोणी आठवण करून द्यायलाही नाही येणार. जे काही करायचे आहे ते तुम्हाला स्वःताला करायचे आहे.

 

बंधू आणि भगिनींनोस्वामी विवेकानंद सांगायचे- “युवक ते असतात जे आपल्या भूतकाळाची चिंता न करता आपल्या भविष्याच्या लक्ष्याच्या दिशेने काम करतात.” तुम्ही सर्व युवापिढी जे आता काम करत आहाततेच देशाच्या भविष्याची दिशा निश्चित करतात. म्हणून तुम्ही आज जो संकल्प करालतोच सिद्ध होऊन देशाला देखील सिद्ध करेल.

 

उत्तर प्रदेशचे एक प्रसिद्ध गीतकार होतेचित्रपटांसाठी देखील त्यांनी काम केले आहे-

 

मजरुह सुल्तानपुरी. त्यांचा एक शेर होता-

 

मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगरलोग साथ आते गये और कारवां बनता  गया ।

 

मित्रांनोप्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी एकट्याने सुरवात करावीच लागते.

 

तुमचे चारित्र्य चांगले असेलहेतू स्पष्ट असेलनिश्चय पक्का असेल तर लोक स्वतःहून तुमच्यासोबत येतात. माझी आज तुम्हा सर्वांकडून हीच अपेक्षा आहे की पहिले पाऊल उचलायच्या आधीकाही संकल्प करून नवीन सुरवात करण्याआधी घाबरू नकाबस निश्चय करा आणि चालायला सुरुवात करा.

 

तुमच्या या प्रवासात सरकार देखीलभारत देखील सर्वार्थाने तुमच्या सोबत उभा आहे.

 

माझी अशी इच्छा आहे की ज्या युवकांना काहीतरी करायचे आहेआपल्या हिंमतीवरआपल्या मेहनतीनेआपली स्वप्न पूर्ण करू इच्छितातत्यांना सगळी मदत मिळेल.

 

जेव्हा ते सुरवात करतीलतेव्हा त्यांना बँक हमीची काळजी करावी लागणार नाहीकर बाबत काळजी करावी लागणार नाहीकागदपत्रांच्या जाळ्यात अडकावे नाही लागणार.

 

मला असे वाटते की देशातील युवकांनी रोजगार निर्माते बनावेनवनिर्मितीसाठी पुढे यावे आणि यासाठी निरंतर काम केले जात आहे.

 

मित्रांनोआमच्या सरकारने आतापर्यंत प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत अंदाजे 10 कोटी लोकांना कर्ज वाटप केले आहे. 10 कोटी हा आकडा खूप मोठा आहे.

 

लोकांना बँकेच्या हमीशिवाय 4 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचे कर्ज देण्यात आले आहे. विचार कराबँकेच्या हमीशिवायतुम्ही पैसे परत कसे करणार ह्याची चौकशी केल्याशिवायकर्ज कसे फेडणार4 लाख कोटींहून अधिक रकमेचे।कर्ज लोकांना दिले आहे.

 

या पैशांनी गावांमध्येखेड्यांमध्येशहरांमध्येलोकांनी आपले छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. ते आपली स्वप्ने पूर्ण करत आहेत. हे लोकंहे लघु आणि छोटे उद्योजक आता स्वतः रोजगार देणारे झाले आहेत.

बंधू आणि भगिनींनोसरकारच्या या मोठ्या योजनेचा एकच आधार आहे. तुमच्यावरदेशातील युवकांवरील विश्वास. आम्हाला विश्वास आहे की ह्या देशातील युवकाने एकदा का निश्चय केला की तो काहीही करून ती कामगिरी फत्ते करतो.

 

असे ऊर्जावान युवक देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आहेत. कोणी डोंगरातून पडणाऱ्या धबधब्यातून वीज निर्मिती करत आहेकोणी कचऱ्यासून वीजनिर्मिती करत आहेकोणी कचऱ्यापासून गृह निर्माणातील वस्तू तयार करत आहेकोणी तंत्रज्ञानाचा वापर करत गावात आरोग्य सुविधा पोहोचवत आहेकोणीतरी आपल्या शेतातच अन्न प्रक्रिया युनिट सुरू केला आहे. असे करोडो युवक राष्ट्र निर्मितीसाठी दिवस रात्र एक करत आहेत.

 

तुमच्यात सामर्थ्य आहेसाहस आहे आणि योग्य दिशेने चालण्याची समज देखील आहे. म्हणूनच तुमचे हात धरून त्याला बळ देण्याचा  सरकारचा प्रयत्न आहे.

 

थोडेसे सहकार्यबाकी तुम्ही स्वतः सक्षम आहात. मित्रांनोआजच्या आवश्यकतेनुसार कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जावे सरकार याकडे देखील लक्ष देत आहे.

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Powering the energy sector

Media Coverage

Powering the energy sector
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM congratulates people of Devbhoomi for 100% first dose of Covid vaccination
October 18, 2021
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has congratulated the people of Devbhoomi for 100% first dose of Covid 19 vaccination for 18+ age group people. The Prime Minister has also said that this achievement of Uttarakhand is very important in the country's fight against Covid 19.

In response to a tweet by the Chief Minister of Uttarakhand, Shri Pushkar Singh Dhami, the Prime Minister said;

"देवभूमि के लोगों को बहुत-बहुत बधाई। कोविड के खिलाफ देश की लड़ाई में उत्तराखंड की यह उपलब्धि अत्यंत महत्वपूर्ण है। मुझे विश्वास है कि वैश्विक महामारी से लड़ने में हमारा वैक्सीनेशन अभियान सबसे अधिक प्रभावी साबित होने वाला है और इसमें जन-जन की भागीदारी अहम है।"