The relationship between India and Palestine is built on the foundation of long-standing solidarity and friendship: PM 
India is committed to be a useful development partner of Palestine, says PM Modi 
India & Palestine sign five MoUs to strengthen cooperation in key sectors

 

सन्माननीय महमौद अब्बास,

पॅलेस्टीनचे राष्ट्रपती, पॅलेस्टीन आणि भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य,

प्रसार माध्यम प्रतिनिधी

महिला आणि सज्जन

भारताचा जुना मित्र देश असणाऱ्या पॅलेस्टीनचे राष्ट्रपती महमौद अब्बास सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे पुन्हा एकदा स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. दोन्ही देशांमधील एकता आणि ऋणानुबंध हे दृढ आहेत. आमचा स्वातंत्र्यासाठी जो संघर्ष सुरू होता, त्या काळापासून हे मित्रत्वाचे नाते निर्माण झाले आहे. सार्वभौम, स्वतंत्र, संयुक्त आणि व्यवहार्य नाते पॅलेस्टीनने जपले आहे, यापुढेही जपण्यात येईल, अशी आशा करतो.  राष्ट्रपती अब्बास यांच्याशी आज झालेल्या संवादामुळे उभय देशातील मैत्रीचे बंध अधिक बळकट होतील, असा विश्वास वाटतो.

मित्रहो,

विविध क्षेत्रात सहभागीता अधिक मजबूत करण्यासंबंधी राष्ट्रपती अब्बास आणि माझ्यात आज अगदी विस्तृत चर्चा झाली. पश्चिम आशिया आणि मध्य पूर्वेमध्ये शांतता प्रक्रियेविषयी आम्ही आपापले विचार मांडले. पश्चिम आशियामधील आव्हानांना तोंड देण्यासाठी शाश्वत, ठोस राजकीय चर्चा झाली तरच या प्रश्नावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा निघू शकतो. यावर आम्हा दोघांचेही एकमत झालं आहे. पॅलेस्टीन आणि इस्रायल यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी आणि सर्वंकष तोडगा काढण्यासाठी उभय बाजूंनी योग्य प्रकारे प्रयत्न होतील, अशी आशा भारताला आहे. पॅलेस्टीनची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि तेथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी भारत सहकार्याचा हात पुढे करत आहे. पॅलेस्टीनच्या क्षमतावृध्दीसाठी आणि विकासासाठी भारत सातत्याने पाठिंबा देत राहणार आहे. याचसाठी वेगवेगळे सामंजस्य-सहकार्याचे करार करण्यात आले आहेत. यामध्ये माहिती तंत्रज्ञान, युवावर्ग आणि कौशल्य विकास या क्षेत्रात भारत प्राधान्याने मदत देणार आहे. भारताच्या नेतृत्वाखाली रामल्लाह येथे ‘टेक्नो-पार्क’ उभारण्यात येणार आहे. एकदा का हे काम पूर्ण झाले की पॅलेस्टीन ‘आयटी हब’ म्हणून सेवा देऊ शकणार आहे. माहिती-तंत्रज्ञानशी संबंधित सर्व प्रकारचे प्रशिक्षण आणि सेवा पुरवण्याची क्षमता पॅलेस्टीनकडे असेल. याशिवाय सांस्कृतिक देवाण-घेवाणही पॅलेस्टीनशी करण्यात येणार आहे. यामध्ये ‘योग’ हा घटक यंदा नव्याने जोडण्यात आला आहे. पुढच्याच महिन्यात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पॅलेस्टीनमधून जास्तीत जास्‍त लोक सहभागी होतील अशी आशा आहे आणि अखेरीस, राष्ट्रपती महमौद अब्बास आणि त्यांच्या शिष्टमंडळाचा हा भारत दौरा आनंददायी आणि फलदायी ठरावा, अशी सदिच्छा व्यक्त करतो. राष्ट्रपती आब्बास यांच्याबरोबर काम करताना उभय देशांमधील संबंध असेच सुदृढ होऊन ते वृध्दींगत होतील अशी आशा व्यक्त करतो.

धन्यवाद!

खूप खूप धन्यवाद! 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Why The SHANTI Bill Makes Modi Government’s Nuclear Energy Push Truly Futuristic

Media Coverage

Why The SHANTI Bill Makes Modi Government’s Nuclear Energy Push Truly Futuristic
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chief Minister of Gujarat meets Prime Minister
December 19, 2025

The Chief Minister of Gujarat, Shri Bhupendra Patel met Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

The Prime Minister’s Office posted on X;

“Chief Minister of Gujarat, Shri @Bhupendrapbjp met Prime Minister @narendramodi.

@CMOGuj”