महामहीम पंतप्रधान,

माझे मित्र,

मार्क रूट

सन्माननीय प्रतिनिधी,

माध्यमांचे सदस्य,

मित्रहो,

पंतप्रधान मार्क, आणि त्यांच्या समवेत आलेल्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात हार्दिक स्वागत. पंतप्रधान मार्क यांच्या समवेत मंत्रीमंडळातले त्यांचे 4 सहकारी, हेगचे मेयर आणि 200 हून अधिक व्यापारी प्रतिनिधी भारतात आले आहेत याचा मला विशेष आनंद आहे. नेदरलँड मधून भारतात आलेले हे सर्वात मोठे व्यापारी प्रतिनिधी मंडळ आहे. दोनही देशादरम्यान व्यापार आणि गुंतवणूक संबंध किती गतिशील आहेत याचेच हे द्योतक आहे. 2015 मधे पंतप्रधान रूट पहिल्यांदा भारतात आले. 2017 मधे मी नेदरलँड दौरा केला आणि आमची तिसरी भेट आज होत आहे. असे खूप कमी देश आहेत ज्यांच्या समवेत आपल्या असलेल्या संबंधात इतक्या वेगाने उच्चस्तरीय भेटी होतात. ही गती आणि भारताबरोबरच्या संबंधाना प्राधान्य दिल्याबद्दल मी माझे मित्र मार्क यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

 

मित्रहो,

आज आम्ही द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रादेशिक आणि जागतिक घडामोडीबाबत स्वतःचे दृष्टीकोन परस्परांसमोर मांडले. दोनही देशांच्या प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीही आम्ही दोघांनी भेट घेतली. गेल्या वर्षी मी नेदरलँडचा दौरा केला तेव्हा मी माझे मित्र मार्क यांना, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे सदस्य होण्याबाबत सकारात्मक दृष्टीने विचार करण्याचा आग्रह केला होता. सौर उर्जा क्षेत्रात नेदरलँडकडे जे तंत्रज्ञान आहे, जो अनुभव आहे, जे नैपुण्य आहे त्याचा लाभ संपूर्ण जगाला मिळायला हवा. आज नेदरलँड,आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा सदस्य झाला आहे याचा मला आनंद आहे. या निर्णय बद्दल मी पंतप्रधान रूट यांचा आभारी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषद ते बहुपक्षीय निर्यात नियमन धोरणापर्यंत भारत आणि नेदरलँड यांच्यातउत्तम आणि घनिष्ठ सहयोग आणिसमन्वय राहिला आहे. आता आंतरराष्ट्रीय सौर आघाडी या आंतरराष्ट्रीय मंचावर आमच्या सहकार्याचा एक नवा आयाम निर्माण होईल.

मित्रहो,

डच कंपन्यांसाठी भारत नवा नाही.अनेक वर्षांपासून शेकडो डच कंपन्या भारतात काम करत आहेत. भारतात आतापर्यंत झालेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीत नेदरलँड हा पाचवा सर्वात मोठा स्त्रोत आहे आणि गेल्या काही काळापासून तर नेदरलँड, तिसरा सर्वात मोठा स्त्रोत म्हणून पुढे आला आहे. त्याचप्र्माणे भारतीय कंपन्यांच्या गुंतवणूकीसाठीही नेदरलँड हे आकर्षक स्थान राहिले आहे. म्हणूनच दोन्ही देशांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट खूप उपयुक्त आहे. भारतात निर्माण होणाऱ्या संधींबाबत, नेदरलँडच्या व्यापारी समुदायात उत्साहाची भावना आहे याचा मला संतोष आहे. भारतातल्या आर्थिक सुधारणांबाबत माझी दृढ कटी बद्धता राहील याबाबत मी त्यांना आश्वस्त केले आहे. कृषी आणि अन्न प्रक्रिया ही क्षेत्रे भारतासाठी विशेष महत्वाची आहेत. हे विषय आपल्या अन्न सुरक्षेशी संबधित आहेत. याचबरोबर भारतातल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आमच्या उद्दिष्टाच्या दृष्टीनेही त्याचे खूप महत्व आहे. या क्षेत्रात नेदरलँडने नैपुण्य प्राप्त केले आहे. गेल्या वर्षी ‘वर्ल्ड फूड इंडिया’ मधे नेदरलँडने, ’फोकस कंट्री’ म्हणून सहभाग नोंदवला होता. 2019 मधे होणाऱ्या ‘वर्ल्ड फूड इंडिया’ मधे नेदरलँडची भागीदारी आणखी जास्त असेल असा मला विश्वास आहे.बारामती मधे,भाज्यांसाठी पहिले भारत-डच सेंटर ऑफ एक्सिलन्स सुरु झाले आहे याचा मला आनंद आहे. अशा प्रकारच्या आणखी केंद्रांसाठी आम्ही एकत्र काम करत आहोत. याच प्रकारे शहर विकासासाठी आमचे सहकार्य गतिमान आहे. वडोदरा आणि दिल्लीमध्ये सांडपाणी व्य्वास्थापानाचे प्रकल्प उत्तम प्रगती करत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आमच्या सहकार्याला 10 वर्षे पूर्ण होत आहेत, 2019 मधे भारतात होणाऱ्या ‘टेक समिट’ मधे भागीदार देश या रूपाने नेदरलँडच्या सहभागाने ही यशस्वी भागीदारी अधिक दृढ होईल.

मित्रहो,

परदेशात राहणाऱ्या भारतीय समाजाशी निगडीत मुद्द्यांकडे विशेष लक्ष पुरवणे याला माझ्या सरकारच्या परकीय धोरणात प्राधान्य राहिले आहे. सप्टेंबर 2017 मधे, सिंट मार्टन मध्ये आलेल्या हरिकेन वादळाच्या वेळी, भारतीय नागरिकांना सुखरूप स्थानी हलवण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल मी पंतप्रधान रूट आणि नेदरलँड सरकारचे विशेष अभिनंदन करतो.

महामहीम,

आपले आणि आपल्या शिष्टमंडळाचे मी भारतात पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो.

धन्यवाद.

खूप-खूप धन्यवाद.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PLI scheme drives ₹41,943 crore in pharma investments, doubles initial commitment

Media Coverage

PLI scheme drives ₹41,943 crore in pharma investments, doubles initial commitment
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister reflects on Navratri’s journey of unwavering faith
March 21, 2026

Prime Minister Shri Narendra Modi shared his reflections today on the spiritual significance of the holy festival of Navratri, highlighting the transformative power of faith in the Mother Goddess.Shri Modi shared a devotional hymn dedicated to the Goddess on this occasion.

The Prime Minister wrote on X:

"जगतजननी माता पर अटूट विश्वास उनके भक्तों में नई चेतना और स्फूर्ति का संचार करने वाला है।"