पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सूरत येथे नव भारत युवा परिषदेत युवकांशी संवाद साधला.

आज भारतात आमूलाग्र परिवर्तन होत आहे. देशातल्या लोकांनी बदल घडवण्याचा निश्चय केल्यामुळेच देश बदलतो आहे असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. काहीच होणार नाही आणि कसलाच बदल होणार नाही ही मानसिकता बदलते आहे आणि त्याचे दृश्य परिणाम आपल्याला दिसत आहेत असे पंतप्रधान म्हणाले.

भारताच्या वाढलेल्या शक्तीविषयी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, “मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर काहीही झाले नाही मात्र आमच्या कार्यकाळात उरी येथे हल्ला झाला. त्या हल्ल्याचा बदला घेतला गेला. हा बदल आज देशात झाला आहे. देशाच्या जवानांच्या हृदयात जी ज्वाला होती तीच आज पंतप्रधानांच्या हृदयात आहे. सर्जिकल हल्ला हे त्याचेच उदाहरण आहे. उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मी झोपू शकलो नाही आणि त्यानंतर काय घडले हे सर्वानांच माहिती आहे.”

केंद्र सरकारने काळ्या पैशाविरोधात उघडलेली मोहिम अतिशय धाडसी पाऊल होते असे ते म्हणाले. 

विमुद्रीकरणानंतर तीन लाख बनावट कंपन्या बंद केल्या गेल्या असे सांगत काळ्या पैशावर आळा घालता येईल असा विचार आधी कोणीही केला नव्हता असे पंतप्रधानांनी सांगितले.

भारतीयांची मानसिकता आणि भावना बदलली असून त्यातूनच देशात परिवर्तन घडेल असा मला विश्वास वाटतो. देश हा सर्वांपेक्षा मोठा असतो ही भावना जनमानसात निर्माण झाली आहे असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Household savings rise to 21.7% of GDP in FY25: Govt

Media Coverage

Household savings rise to 21.7% of GDP in FY25: Govt
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 04 ऑगस्ट 2026
August 04, 2026

From Auto PLI to Ramsar Sites: How India is Winning on Every Front Under PM Modi