Indian diaspora across the world are true and permanent ambassadors of the country, says PM Modi
In whichever part of the world Indians went, they not only retained their Indianness but also integrated the lifestyle of that nation: PM
Aspirations of India’s youth and their optimism about the country are at the highest levels: PM Modi
India, with its rich values and traditions, has the power to lead and guide the world dealing with instability: PM Modi
At a time when the world is divided by ideologies, India believes in the mantra of ‘Sabka Sath, Sabka Vikas’: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारतीय वंशांच्या अनिवासी संसदपटू परिषदेला संबोधित केले. 

परिषदेला उपस्थित असलेल्या प्रतिनिधींचे स्वागत करतांना पंतप्रधान म्हणाले की, गेल्या शेकडो  वर्षांच्या काळात अनेक लोकांनी  भारत सोडला असला, तरी त्यांच्या मनात आणि हृदयात भारताचे स्थान कायम आहे. भारतीय वंशांचे लोक  त्यांच्या दत्तक भूमीशी पूर्णत: एकरुप झाले आहेत, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही, असे पंतप्रधानांनी सांगितले. या सर्वांनी आपल्यातले भारतीयत्व कायम राखले असले, तरी त्या देशांमधली भाषा, अन्नपदार्थ आणि पेहराव आत्मसात  केले आहे असे पंतप्रधान म्हणाले. आज नवी दिल्लीत  भारतीय वंशांच्या संसदपटूचे लघु विश्वच  एकत्र आले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. मॉरीशस, पोर्तुगाल आणि आयर्लंडमध्ये  भारतीय वंशाच्या व्यक्ती पंतप्रधानपदी आहेत, त्यांनी सांगितले. इतर अनेक देशात भारतीय वंशांच्या व्यक्ती राष्ट्रप्रमुख  असल्याचेही त्यांनी सांगितले. 

गेल्या 3 ते 4 वर्षात भारताच्या जागतिक छबीत बदल झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारताचे परिवर्तन होत आहे हे या मागील कारण आहे, असे ते म्हणाले भारताच्या आशा आणि आकांक्षा सर्वोच्च पातळीवर  आहेत. प्रत्येक क्षेत्रात स्थायी बदलाची चिन्हे दिसून येत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. 

भारतीय वंशाचे अनिवासी हे जिथे वास्तव्य करतात तिथे भारताचे कायमस्वरुपी राजदूत असल्यासारखे आहेत आणि परदेश दौऱ्यावर त्यांना भेटण्याचा नेहमीच प्रयत्न करतो, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

परदेशातल्या भारतीय नागरिकांच्‍या प्रश्नावर सदैव लक्ष ठेवून असल्याबद्दल पंतप्रधानांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज  यांची प्रशंसा केली. यासंदर्भात परराष्ट्रातील दूतावासाकडे आलेल्या तक्रारींना  प्रतिसाद देण्यासाठी असलेला “MADAD” पोर्टलचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. 

भारताच्या विकासात अनिवासी  भारतीय भागिदार असल्याचा सरकारचा ठाम विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. निती आयोगाने आखलेल्या 2020 पर्यंतच्या कृती आराखडयात अनिवासी भारतीयांना महत्वपूर्ण स्थान आहे असे ते म्हणाले. 

अस्थिरतेच्या युगात भारतीय संस्कृती संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक ठरु शकते असे त्यांनी सांगितले. 

आसियान देशांबरोबर भारताचे घनिष्ठ संबंध  असून, येत्या काही दिवसात होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी त्याचे दर्शन घडेल असे पंतप्रधान म्हणाले.

Click here to read full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Paltano Dorkar!’ PM Modi Predicts TMC Rout In Bengal, Says ‘Goons Won’t Find Space To Hide After May 4’

Media Coverage

‘Paltano Dorkar!’ PM Modi Predicts TMC Rout In Bengal, Says ‘Goons Won’t Find Space To Hide After May 4’
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 एप्रिल 2026
April 24, 2026

Made in India, Built for 2047: PM Modi’s Reforms Turning Rural Hope into National Strength