India is one of the world's leading digital economies and we're developing digital infrastructure at rapid pace: PM
Digital audit & digital governance can strengthen institutional memory for several organisations: PM Modi
I'm sure that CAG will play a strong role in the formation of New and Clean India: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत झालेल्या महालेखापाल आणि उपमहालेखापाल यांच्या परिषदेत भाषण केले. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, देशात कालबद्ध आणि फलश्रुती आधारीत कार्यव्यवस्था विकसित करण्यात कॅग म्हणजेच महालेखापालांची भूमिका अतिशय महत्वाची आहे.

कॅगने घेतलेल्या परिश्रमांमुळेच, त्यातही प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळेच ही कार्यसंस्कृती भारतात रुजणे शक्य झाले आहे. कामाला समर्पित असलेल्या ऑडिटर्समुळेच कॅगची विश्वासार्हता आणि शक्ती कायम आहे, असे पंतप्रधान म्हणाले. अशा जुन्या आणि प्रस्थापित संस्थेत बदल घडवून आणणे हेच एक आव्हान आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

बदल आणि सुधारणा हे आज-काल परवलीचे शब्द झाले आहेत, मात्र प्रत्यक्ष सुधारणा तेव्हाच घडते जेव्हा एखाद्या संस्था किंवा व्यवस्थेतील सर्व स्तरातले लोक ती घडवण्यासाठी संपूर्ण प्रामाणिकपणे आणि समर्पित वृत्तीने काम करतात. ही बाब प्रत्येक सरकारला आणि देशातल्या प्रत्येक संस्थेलाही लागू आहे.

कॅगही त्यातलीच एक संस्था आहे. कॅगच्या लेखापरीक्षण प्रक्रियेतही मोठे बदल झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. कॅगच्या कामांचा प्रशासनावर थेट परिणाम होतो, असेही पंतप्रधान म्हणाले. त्यामुळे कॅगच्या परीक्षणात फार वेळ लागायला नको, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. कॅगने आता कॅगप्लसच्या दिशेने वाटचाल करावी, असे पंतप्रधानांनी सूचित केले.

Click here to read full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PMAY-U Nears 1.25 Crore Homes: Top 10 States With The Highest PMAY-U Completion Rates

Media Coverage

PMAY-U Nears 1.25 Crore Homes: Top 10 States With The Highest PMAY-U Completion Rates
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 जून 2026
June 24, 2026

Appreciation for PM Modi’s Vision for Holistic Growth, Furthering Technology as well as Traditions