पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोक कल्याण मार्गावर (पीएमओ) पंतप्रधान अधिकारी आणि (एसपीजी) विशेष संरक्षण समुह कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी 1000 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाचे पंतप्रधानांनी कौतुक केले आणि त्यांनी भविष्यातही चांगले काम करत राहावे यासाठी प्रोत्साहन दिले.





