शेअर करा
 
Comments
लसीबाबत जनजागृती करण्यासाठी व लसीकरणाची टाळाटाळ दूर करण्यासाठी पंतप्रधानांनी नेत्यांना सरकारसोबत काम करण्याचे केले आवाहन
महामारी दरम्यान दिलेली मदत ही एक भारत-एकनिष्ठ प्रयासचे एक लक्षणीय उदाहरण आहेः पंतप्रधान
प्रत्येकाचा आझादी का अमृत महोत्सवात सहभाग सुनिश्चित करण्याचे पंतप्रधानांचे नेत्यांना आवाहन
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने भारत जोडो आंदोलनाच्या माध्यमातून देशाला एकत्रित करण्याच्या दिशेने कार्य करूयाः पंतप्रधान
कोविड -19 विरुद्धच्या लढ्यात नेतृत्व केल्याबद्दल नेत्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार; कोविड -19 ची तिसरी लाट रोखण्यासाठी मनापासून दिले समर्थन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी कोविड -19 च्या परिस्थितीबद्दल धार्मिक आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

देश हितासाठी समाज आणि सरकार एकत्रित काम करत असल्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे हा संवाद असल्याचे पंतप्रधान म्हणाले. कोविड -19 ने उद्‌भवलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी या संस्थांनी केलेल्या कामांचे त्यांनी कौतुक केले. लोकांना देण्यात येणारी मदत ही जात किंवा धार्मिक विचारांच्या पलीकडची असून हे एक भारत-एकनिष्ठ प्रयासचे एक लक्षणीय उदाहरण आहे असे ते म्हणाले. गरजूंना अन्न आणि औषधे मिळवून देण्यात मदत करण्याबरोबरच देशभरातील मंदिरे, मशिदी, चर्च आणि गुरुद्वारा ह्यांनी  रुग्णालये आणि विलगीकरण केंद्रे म्हणूनही काम केले असे त्यांनी सांगितले. 

देशातील लसीकरण मोहीम जलदगतीने सुरु असल्याबद्दल सांगतानाच पंतप्रधानांनी ‘सर्वाना मोफत लस’ ही मोहीम कोरोनाविरूद्धच्या लढ्यात ढालीसारखी असल्याचे म्हटले. त्यांनी लसीबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच लसीबद्दलच्या अफवा व गोंधळ दूर करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नात सामील होण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी त्यांना सरकारच्या सहकार्याने काम करण्यास सांगितले, विशेषत: अशा ठिकाणी जेथे लसीची कमतरता आहे. हे आमच्या आरोग्य कर्मचार्‍यांपर्यंत आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यात मदत करेल.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांनी नेत्यांना सांगितले. प्रत्येकजण ‘आझादी का अमृत महोत्सवात’ सहभागी होईल हे सुनिश्चित करण्यास त्यांनी त्यांना सांगितले. ते म्हणाले की, या निमित्ताने आपण ‘भारत जोडो आंदोलन’ च्या माध्यमातून देशाला एकत्रित करण्याच्या दिशेने कार्य केले पाहिजे आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही खरी भावना दर्शविली पाहिजे.

या संवादात, केंद्रीय धार्मिक जन मोर्चाचे संयोजक आणि जमात-ए-इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष प्रा. सलीम इंजिनिअर; उत्तर प्रदेशच्या भारतीय सर्व धर्म संसदेचे राष्ट्रीय संयोजक महाऋषी पीठाधीश्वर गोस्वामी सुशील महाराज; नवी दिल्लीच्या ओंकार धामचे पीठाधीश्वर, स्वामी ओंकारानंद सरस्वती; सिंह साहिब ज्ञानी रणजित सिंह, मुख्य ग्रंथी, गुरुद्वारा बांगला साहिब, नवी दिल्ली; डॉ. एम. डी. थॉमस, संस्थापक संचालक, हार्मनी अँड पीस स्टडीज, नवी दिल्ली; स्वामी वीरसिंह हितकरी, अध्यक्ष, अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटना; स्वामी संपत कुमार, गलता पीठ, जयपूर; आचार्य विवेक मुनि, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय महावीर जैन मिशन, नवी दिल्ली; डॉ. ए. के. मर्चंट, राष्ट्रीय विश्वस्त आणि सचिव, लोटस मंदिर आणि भारतीय बहाय समुदाय, नवी दिल्ली; स्वामी शांततामानंद, अध्यक्ष, रामकृष्ण मिशन, नवी दिल्ली; आणि सिस्टर बी. के. आशा, ओम शांती रिट्रीट सेंटर, हरियाणा हे सहभागी झाले होते.

संवाद आयोजित केल्याबद्दल नेत्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आणि महामारी विरूद्धच्या लढ्यात त्यांच्या निर्णायक नेतृत्वाचे कौतुक केले. त्यांनी कोविड -19 मध्ये उद्‌भवलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या धार्मिक आणि सामाजिक संस्थांनी केलेल्या अनुकरणीय कार्याबद्दल माहिती दिली. सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेबद्दल जनजागृती करण्याच्या दिशेने त्यांनी पाठिंबा दर्शविला आणि तिसरी लाट रोखण्यासाठी त्यांच्या कल्पना व सूचना दिल्या.

 

 

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
 Watch: PM Modi shares lesson on hard work vs smart work using this classic tale at 'Pariksha Pe Charcha'

Media Coverage

Watch: PM Modi shares lesson on hard work vs smart work using this classic tale at 'Pariksha Pe Charcha'
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Tune in to hear Mann Ki Baat on 29th January 2023
January 28, 2023