पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन नेट झिरो दिशेने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
गेल्या 9 वर्षांत सौर क्षमता 54 पट वाढली आहे असे रेल्वेने X वर पोस्ट केले होते. मार्च 2014 पर्यंत स्थापित सौर उर्जा क्षमता 3.68 मेगावॅट होती तर 2014-23 या कालावधीत 200.31 मेगावॅट सौर ऊर्जा स्थापित करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली.
यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले:
"हरित भविष्याप्रति आपल्या वचनबद्धतेत प्रशंसनीय प्रगती झाल्याचे हे दर्शवते. केवळ 9 वर्षात, आपण #MissionNetZero कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने उल्लेखनीय प्रगती करत आपली क्षमता लक्षणीयरीत्या वाढवली आहे. भारतासाठी उज्ज्वल आणि शाश्वत भविष्य सुनिश्चित करणारा हा प्रवास असाच पुढे चालू ठेवूया."
Shows commendable progress in our commitment towards a greener future. In just 9 years, we have enhanced our capacity significantly, taking significant strides towards #MissionNetZero Carbon Emission. Let us continue this journey, ensuring a brighter and sustainable tomorrow for… https://t.co/K1mmwlWCEw
— Narendra Modi (@narendramodi) August 29, 2023