संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाच्या शिल्पकारांना आदरांजली वाहिली आहे. विकसित भारताच्या निर्मितीमध्ये देशाच्या सामूहिक प्रयत्नांना प्रेरणा देणारी त्यांची दूरदृष्टी आणि काळाच्या पुढे पाहण्याचा दृष्टिकोन पंतप्रधानांनी अधोरेखित केला.
भारताचे संविधान मानवाच्या प्रतिष्ठेला, समानतेला आणि स्वातंत्र्याला सर्वोच्च महत्त्व देते यावर पंतप्रधानांनी भर दिला. संविधान नागरिकांना अधिकार बहाल करतानाच त्यांच्या कर्तव्यांची देखील जाणीव करून देते, ज्यांचे पालन अतिशय प्रामाणिकपणे आणि निर्धाराने करणे आवश्यक आहे, ही कर्तव्येच एका चैतन्यशील आणि भक्कम लोकशाहीचा पाया मजबूत करतात, असे ते म्हणाले.
राष्ट्राच्या संकल्पाचा पुनरुच्चार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना त्यांच्या कृतींमधून संविधानिक मूल्ये अधिक बळकट करण्याचे आवाहन केले ज्यामुळे देशाच्या प्रगतीत आणि एकतेत मोलाचे योगदान देता येईल.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे :
“संविधान दिनी, आपण आपल्या संविधान निर्मात्यांना आदरांजली वाहत आहोत. त्यांचा दूरदर्शी दृष्टिकोन आणि दूरदृष्टी विकसित भारत घडवण्याच्या आमच्या प्रयत्नांना सतत प्रेरित करतात.
आपले संविधान मानवाच्या प्रतिष्ठेला, समानतेला आणि स्वातंत्र्याला सर्वोच्च महत्त्व देते. संविधान आपल्याला अधिकार प्रदान करतानाच नागरिक म्हणून आपल्या काही कर्तव्यांचे स्मरण करून देते, ही कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण नेहमीच केला पाहिजे. ही कर्तव्य मजबूत लोकशाहीचा पाया आहेत.
आपल्या कृतींमधून संविधानिक मूल्ये अधिक बळकट करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा आपण पुनरुच्चार करुया.”
On Constitution Day, we pay tribute to the framers of our Constitution. Their vision and foresight continue to motivate us in our pursuit of building a Viksit Bharat.
— Narendra Modi (@narendramodi) November 26, 2025
Our Constitution gives utmost importance to human dignity, equality and liberty. While it empowers us with…


