आपण आपल्या गुरूंच्या सल्ल्यानुसार शेती केली पाहिजे आणि धरती मातेचे रक्षण केले पाहिजे. गुरु नानक देवजींच्या शिकवणीच्या पलीकडे काहीही नाही : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी  दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील प्रतिनिधींसह देशभरातून हजारो विकसित भारत संकल्प यात्रेचे लाभार्थी सहभागी झाले होते.

पंजाबच्या गुरुदासपूर येथील गुरविंदर सिंग बाजवा यांनी पंतप्रधानांना सांगितले की,"विकसित भारत यात्रेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांनी लहान गटांमध्ये एकत्र येऊन कृषी क्षेत्रात सर्वोत्तम नफा मिळवला आहे. तसेच  त्यांनी पंतप्रधानांना हेही सांगितले की," त्यांचा शेतकरी गट सर्व प्रकारच्या दुष्परिणामांपासून मुक्त शेतीसाठी काम करत आहे आणि त्यासाठी त्यांना यंत्रसामग्रीवर अनुदानही मिळाले आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकर्‍यांना शेतीमधील कापणीनंतर मागे राहणाऱ्या अवशेषांचे व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य यामध्ये मदत झाली.बाजवा यांनी माहिती दिली की, सरकारच्या पाठिंब्यामुळे गुरुदासपूरमध्ये कापणीनंतर मागे राहणारे अवशेष जाळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. शेतकरी उत्पादक  संघटनेशी (एफपीओ) संबंधित उपक्रमही परिसरात सुरू आहेत. कस्टम हायरिंग योजनेंतर्गत 50 किमीच्या परिघात असलेल्या छोट्या शेतकऱ्यांना मदत करत आहे.

बाजवा म्हणाले, "आता शेतकऱ्याला योग्य आधार मिळेल असे वाटते -मोदी है तो मुमकीन है " तसेच पंतप्रधान मोदींकडून खूप अपेक्षा असल्याचे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले की," शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यानेच हे शक्य झाले आहे." शाश्वत शेतीसाठी पंतप्रधानांनी आपल्या विनंतीचा पुनरुच्चार केला आणि ते म्हणाले की, “आपण आपल्या गुरूंच्या सल्ल्यानुसार शेती केली पाहिजे आणि धरती मातेचे रक्षण केले पाहिजे. शेतीच्या क्षेत्रात गुरु नानक देवजींच्या शिकवणीपलीकडे काहीही नाही.'' विकसित भारत संकल्प यात्रेबाबत पंतप्रधान म्हणाले की,"मोदींच्या गॅरंटीची गाडी प्रत्येक शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचेपर्यंत थांबणार नाही."

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
In young children, mother tongue is the key to learning

Media Coverage

In young children, mother tongue is the key to learning
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 डिसेंबर 2024
December 11, 2024

PM Modi's Leadership Legacy of Strategic Achievements and Progress