पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतातील दुग्ध उत्पादक शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेप्रती सरकारच्या अढळ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. पोषण सुरक्षेची खात्री करण्यात आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यात दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची पंतप्रधानांनी दखल घेतली.
राष्ट्रीय गोकुळ अभियान, सहकारी संस्थांना अधिक सहाय्य आणि शाश्वत क्षेत्रीय सुधारणा अशा प्रमुख उपक्रमांद्वारे, सरकारने दुग्ध क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण करण्यासाठी सातत्याने काम केले आहे. ताज्या #NextGenGST सुधारणा या उद्दीष्टाकडे जाणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
अमूल सहकारी संस्थेने X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान मोदी म्हणाले:
“भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात आणि लाखो लोकांसाठी पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्यात आपल्या अन्नदात्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
राष्ट्रीय गोकुळ अभियानासारखे उपक्रम, सहकारी संस्थांना मदत आणि सातत्यपूर्ण सुधारणा याद्वारे, आमचे सरकार भारताच्या दुग्ध क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी वचनबद्ध आहे.
#NextGenGST सुधारणा हे लाखो दुग्ध उत्पादकांना सक्षम बनवण्यासाठी, मूल्यवर्धनाला चालना देण्यासाठी आणि दुग्धजन्य पदार्थ प्रत्येक घराकरिता अधिक परवडणारे बनवण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
The contribution of our Annadatas has been pivotal in strengthening India’s rural economy and ensuring nutritional security for millions.
— Narendra Modi (@narendramodi) September 4, 2025
Through initiatives like the Rashtriya Gokul Mission, support for cooperatives and continuous reforms, our Government remains committed to… https://t.co/GSeKhPUt6c


