भारताचे G20 अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित आहे
वंचितांची, रांगेतील अगदी शेवटच्या व्यक्तीची सेवा करण्याच्या गांधीजींच्या मिशनचे अनुकरण करणे महत्त्वाचे

नवी दिल्ली G20 शिखर परिषद मानवकेंद्रित आणि सर्वसमावेशक विकासाचा एक नवा मार्ग प्रशस्त करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. भारताचे G20 अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित आहे, जिथे दक्षिणेकडील देशांच्या विकास विषयक समस्या सक्रियपणे मांडल्या गेल्या आहेत यावर त्यांनी भर दिला.

वंचितांची सेवा करण्याच्या गांधीजींच्या ध्येयाचे अनुकरण करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी प्रगतीला चालना देणाऱ्या  मानव-केंद्रित मार्गावर भारताचा अधिक भर आहे याकडे लक्ष वेधले.

‘एक पृथ्वी’, ‘एक कुटुंब’ आणि ‘एक भविष्य’ या विषयावरील सत्रे त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत, ज्यात मजबूत, शाश्वत, सर्वसमावेशक आणि संतुलित विकासासह जागतिक समुदायाला भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांचा देखील समावेश असेल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.  मैत्री आणि सहकार्याचे बंध अधिक दृढ करण्यासाठी अनेक नेते आणि शिष्टमंडळ प्रमुखांसोबत द्विपक्षीय बैठका घेत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

पंतप्रधान पुढे म्हणाले की राष्ट्रपतींनी  प्रमुख नेत्यांसाठी 9 सप्टेंबर 2023 रोजी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. जी20 देशांचे नेते 10 सप्टेंबर 2023 रोजी राजघाट येथे महात्मा गांधींना आदरांजली वाहतील. त्याच दिवशी समारोप समारंभात, G20 नेते एक शाश्वत आणि न्याय्य 'एक भविष्य', 'एक कुटुंब' प्रमाणे एकजूट आणि सुदृढ  'एक पृथ्वी' प्रति  त्यांचे सामूहिक विचार  सामायिक करतील.

X वर एक थ्रेड शेअर करत पंतप्रधान म्हणाले:

“नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 9-10 सप्टेंबर 2023 रोजी 18 व्या G20 शिखर परिषदेचे आयोजन करताना भारताला आनंद होत आहे. भारत यजमानपद भूषवत असलेली ही पहिलीच G20 शिखर परिषद आहे. पुढील दोन दिवसांत जागतिक नेत्यांसोबत फलदायी चर्चेसाठी मी उत्सुक आहे.

मला ठाम विश्वास आहे की नवी दिल्ली G20 शिखर परिषद मानव-केंद्रित आणि सर्वसमावेशक विकासाचा एक नवा मार्ग प्रशस्त  करेल."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Since 2019, a total of 1,106 left wing extremists have been 'neutralised': MHA

Media Coverage

Since 2019, a total of 1,106 left wing extremists have been 'neutralised': MHA
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 डिसेंबर 2025
December 13, 2025

PM Modi Citizens Celebrate India Rising: PM Modi's Leadership in Attracting Investments and Ensuring Security