दोन्ही नेत्यांनी भारत आणि नेदरलँड्स यांच्या दरम्यान असलेले विशेष आणि मौल्यवान संबंध अधोरेखित केले
दोन्ही देशांदरम्यान असलेले द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यासंदर्भातील कटिबद्धतेचा पंतप्रधान मोदी यांनी केला पुनरुच्चार

नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुटे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन बातचीत केली.

पंतप्रधान मोदी यांना निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान रुटे यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पंतप्रधानपदाच्या ऐतिहासिक अशा तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान रुटे यांच्या शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशांच्या दरम्यान असलेले दृढ संबंध आणखी बळकट करण्यासाठी पंतप्रधान रुटे यांनी दाखवलेल्या व्यक्तिगत स्वारस्याची प्रशंसा केली.
दोन्ही नेत्यांनी भारत आणि नेदरलँड्स यांच्या दरम्यान असलेले विशेष आणि मौल्यवान संबंध यावेळी अधोरेखित केले.
यावेळी दोन्ही देशांतील सामान्य लोकांच्या कल्याणासाठी दोन्ही देशांमध्ये असलेले द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करण्यासाठी काम करत राहण्याच्या वचनबद्धतेला पंतप्रधान मोदी यांनी दुजोरा दिला.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's $13 billion semiconductor mission: Boosting domestic chip manufacturing and design

Media Coverage

India's $13 billion semiconductor mission: Boosting domestic chip manufacturing and design
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 8 सप्टेंबर 2026
September 08, 2026

Viksit Bharat, Many Engines: Defence, Diplomacy, Growth & Green Power Under PM Modi